Join us

यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 14:08 IST

How To Make Dahi Mirchi : Dahi Mirchi Recipe : Mirchi With Curd Recipe : वाळवणाच्या पदार्थात हमखास घरोघरी केल्या जाणाऱ्या दही मिरचीची सोपी रेसिपी...

आपल्या संपूर्ण जेवणाच्या ताटाला खरी चव येते ती त्यात असणाऱ्या तोंडी लावायच्या पदार्थांमुळेच. जेवणाच्या ताटात वरण, भात, भाजी, पोळी असे सगळे पदार्थ असले तरीही चटण्या, कोशिंबीर, लोणची, पापड असे तोंडी लावायचे (Mirchi With Curd Recipe) पदार्थ तर हवेच. तोंडी लावण्यासाठीच्या पदार्थांशिवाय जेवणाचे ताट अपूर्णच आहे. असे काही (Dahi Mirchi Recipe) वेगवेगळे तोंडी लावण्याचे पदार्थ आपण शक्यतो उन्हाळ्यातच करून ठेवतो. वर्षभर पुरणारे हे तोंडी लावायचे पदार्थ जसे की पापड, लोणची, मुरांबा, कुरडया, सांडगे हमखास सगळ्यांच्याच घरी तयार केले जातात(How To Make Dahi Mirchi).

या साठवणीच्या पदार्थांमध्ये 'दही मिरची' हा खास मिरचीचा चमचमीत असा तोंडी लावायचा पदार्थ देखील केला जातो. या मिरच्यांची पाकिटं बाजारात अनेक दुकानांमध्ये मिळतात, परंतु या पाकिटातील मिरच्या हव्या तशा पुरवठ्याला येत नाहीत. पाकीट विकत आणलं तर ते एक किंवा दोन वापरतच संपून जाते. यासाठी आपण वर्षभर पुरवठ्याला येणारी तसेच दीर्घकाळ टिकणारी अशी चटपटीत चवीची मस्त झणझणीत दही मिरची घरच्या घरीच करु शकतो. दही मिरची घरच्याघरीच तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. धणे - ४ टेबलस्पून २. बडीशेप - ३ टेबलस्पून ३. मेथी दाणे - १/२ टेबलस्पून ४. जिरे - १ टेबलस्पून ५. हिरव्या मिरच्या - अर्धा किलो६. हिंग - १/२ टेबलस्पून ७. काळे मीठ - २ टेबलस्पून ८. ओवा - १/२ टेबलस्पून ९. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून १०. दही - २ टेबलस्पून (पाणी निथळेलेले घट्ट - दाटसर दही)

वाटीभर कुळीथ दळून करा अस्सल मालवणी पद्धतीचं पारंपरिक कुळथाचं पिठलं, करायला सोपे खायला पौष्टिक...

फक्त १० मिनिटांत करा शेवगा फ्राय, तोंडी लावण्यासाठी पौष्टिक पदार्थ, खा मनसोक्त...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्या व्यवस्थित पुसून त्यातील पाण्याचा अंश संपूर्णपणे काढून टाकावा. २. आता या मिरच्यांना बरोबर मधोमध सुरीने उभी चीर देत कापून घ्यावे. ३. एक मोठा पॅन घेऊन त्यात धणे, बडीशेप, मेथी दाणे, जिरे असे एकामागून एक जिन्नस घालून परतवून घ्यावे. ४. सगळे जिन्नस व्यवस्थित कोरडे परतवून घेतल्यानंतर एका डिशमध्ये काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. 

५. सगळे भाजून घेतलेले जिन्नस थंड झाल्यानंतर एका मिक्सर बाऊलमध्ये हे सगळे जिन्नस ओतावे. आता मिक्सरमध्ये सगळे जिन्नस वाटून व्यवस्थित त्याची बारीक पूड करून घ्यावी. ६. ही मिक्सरमध्ये वाटून घेतलेली बारीक पूड एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. यात हिंग, काळे मीठ, ओवा, आमचूर पावडर घालावी. सगळ्यांत शेवटी या पावडरच्या मिश्रणात पाणी निथळून घेतलेले घट्ट दही घालावे. आता चमच्याने हा सगळा मसाला व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्यावा. ७. आता हा तयार मसाला कापून घेतलेल्या मिरच्यांमध्ये भरुन घ्यावा. आता या मिरच्या एका डिशमध्ये ठेवून डिश २ ते ३ दिवस ऊन्हात ठेवून मिरच्या व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. ८. या वाळवून घेतलेल्या मिरच्या एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवाव्यात. ९. जेव्हा आपल्याला ही दही मिरची खायची असेल तेव्हा तेलांत ही मिरची खरपूस तळून घ्यावी. 

तोंडी लावण्यासाठी दही मिरची तयार आहे. गरमागरम वरण भातासोबतच आपण ही दही मिरची खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल