Join us

मैदा-पाव नको!शिळ्या चपातीचे करा दाबेली रॅप,चवदार स्ट्रीट फूड रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2025 12:27 IST

Dabeli wrap recipe: How to make dabeli wrap at home: Indian street food wrap: मैदा - पावाशिवाय घरच्या घरी दाबेली रॅप कसा करायचा?

मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये सगळ्यात प्रसिद्ध असणारी आणि चवीला आंबट-गोड लागणारी दाबेली आपण टेस्टी केली असेलच.(Dabeli wrap recipe) मुंबईच्या कोणत्याही रस्त्यांवर खाऊच्या गाडीवर हमखास मिळते. हा पदार्थ गुजरातमधला असला तरी देखील तितकाच फेमस मुंबईमध्ये देखील आहे.(How to make dabeli wrap at home) चिंच-गूळाची चटणी, शेव, कांदा, डाळिंब आणि पावात भरलेला मसाला या पदार्थाची चव वाढवतो. (Indian street food wrap)दाबेली खायची असेल तर हमखास यात पाव वापरला जातो.(Kachchi dabeli wrap) खाताना याच्या आत भरलेला मसाला व्यवस्थित बनलेला नसेल तर त्याची चव बिघडते.(Street food fusion recipe) पाव किंवा मैदाच्या वापर न करता आपण दाबेलीची चव चाखू शकतो. अगदी शिळ्या चपातीपासून दाबेली रॅप तयार करता येईल. आपणही घरच्या घरी मस्तपैकी दाबेली रॅप बनवू शकतो पाहूया रेसिपी (Mumbai street food recipes)

करा कुरकुरीत कोबीचे कटलेट, सकाळचा नाश्ता होईल इतका चविष्ट की दिवसभर वाटेल आनंदी! पाहा रेसिपी

साहित्य 

१ टीस्पून- जिरे१ टीस्पून- धणे १ टीस्पून- तीळ१ टीस्पून -बडीशेप३ - लवंगा१ -वेलची १- स्टार फूल१ - दालचिनी१- तमालपत्र२ चमचे- सुकलेले खोबरे २ चमचे- काश्मिरी लाल मिरची पावडर१ टीस्पून- हळद१ टीस्पून- आमचूर पावडर१ टीस्पून- काळे मीठ ३ चमचे- साखर१ टीस्पून -मीठ

उकडून मॅश केलेले बटाटे - ५०० ग्रॅमतेल - ३ चमचे जिरे - १ चमचा आले पेस्ट - १ चमचा दाबेली मसाला - ५ ते ६ चमचे चिंच चटणी - ३ चमचे पाणी - ३ चमचे चिरलेली कोथिंबीर - १/२ कप शेव- १/२ कप डाळिंबाचे दाणे - १/२ कप मसाला शेंगदाणे - १/२ कप चपाती - आवश्यकतेनुसार हिरवी चटणी चीज बटर 

कृती 

1. सगळ्यात पॅनमध्ये जिरे, धणे, बडीशेप, तीळ इतर मसाले आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालून चांगले परतून घ्या. 

2. मसाला थंड झाल्यानंतर मिक्सच्या भांड्यात घेऊन त्यात लाल मिरची पावडर, हळद, आमचूर पावडर, काळे मीठ, साखर घालून वाटून घ्या. 

3. आता कढईमध्ये तेल तापवून त्यात जीरे, आल्याची पेस्ट घालून परतवून घ्या. त्यानंतर तयार मसाला, चिंचेची चटणी आणि पाणी घालून चांगले ढवळून घ्या. 

4. यामध्ये आता मॅश केलेले बटाटे घालून चांगले परतवून घ्या. एका ताटात तयार बटाट्याची भाजी पसरवून घ्या. वरुन कोथिंबीर, मसाले शेंगदाणे, शेव आणि डाळिंबाचे दाणे पसरवा. 

5. तव्यावर चपाती ठेवून त्याला हिरवी आणि चिंच चटणी लावा. दाबेली मसाला एका बाजूला भरुन घ्या. त्यावर शेव, चीज घालून दुसऱ्या बाजूने बंद करा. वरुन बटर लावून लालसर होईपर्यंत फ्राय करा. 

6. तयार चपातीचे दोन भाग करुन चिंच चटणी आणि शेव लावा. आवडीने खा चटपटीत दाबेली रॅप  

टॅग्स :अन्नपाककृती