हैद्राबादी खाद्यसंस्कृती म्हटलं की मसालेदार, सुगंधी आणि समृद्ध चवीचे पदार्थ लगेचच आठवतात. त्यापैकीच एक खास आणि पारंपरिक डिश म्हणजे ( daalcha recipe) हैद्राबादी दालचा. डाळ, भाजीपाला, चिंच आणि खास हैद्राबादी मसाल्यांच्या मिश्रणातून तयार होणारी ही दालचा डिश आंबट, तिखट आणि चविष्ट असते. अगदी हैद्राबादी झणझणीत चवीचा परिपूर्ण अनुभव देणारी अशी ही पारंपरिक हैद्राबादी डिश! बिर्याणी किंवा भाताबरोबर सर्व्ह केली जाणारी ही डिश फक्त चवदारच नाही तर तितकीच पौष्टिक देखील असते(hyderabadi daalcha recipe).
दालचाची खरी मजा तेव्हाच येते, जेव्हा त्याची चव अगदी 'अस्सल हैदराबादी' असते, जी तुम्हाला प्रत्येक घासामध्ये आठवण करून देईल की तुम्ही एका शाही मेजवानीचा आनंद घेत आहात. पण तो परफेक्ट, हॉटेलमध्ये मिळतो तसा दालचा घरी तयार करण सोपं आहे, अनेकदा प्रयत्न करूनही ती अस्सल हैदराबादी चव येत नाही यासाठी घरच्याघरीच अस्सल (how to make daalcha at home) पारंपरिक पद्धतीने दालचा तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. चणा डाळ - १ कप (पाण्यात भिजवून घेतलेली घेतलेली)
२. हळद - १/२ टेबलस्पून
३. पाणी - गरजेनुसार
४. तेल - २ ते ३ टेबलस्पून
४. जिरे - १ टेबलस्पून
५. हिंग - चिमूटभर
६. कांदा - २ ते ३ (उभा चिरुन घेतलेला)
७. टोमॅटो - २ ते ३ (मध्यम आकारात कापून घेतलेले)
८. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या
९. मीठ - चवीनुसार
१०. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१२. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
१३. जिरेपूड - १ टेबलस्पून
१४. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१५. तळलेला कांदा - २ ते ३ टेबलस्पून
१६. धणेपूड - १ टेबलस्पून
१७. चिंचेचा कोळ - १ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यात आधी चणा डाळ पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर, कुकरमध्ये पाणी व हळद घालून डाळ ५ ते ६ शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजवून घ्यावी.
२. एका दुसऱ्या भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात जिरे, हिंग, उभा चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, आलं - लसूण पेस्ट, लाल - तिखट मसाला, धणे - जिरेपूड, हळद, आमचूर पावडर व थोडे पाणी घालावे. त्यानंतर मंद आचेवर हे सगळे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यावे.
उडपी 'अण्णा' स्टाईल पांढरीशुभ्र चटणी! परफेक्ट चवीसाठी ७ टिप्स - डोसा, वडा, इडली खा मनसोक्त...
कवडी दही लावण्याची राजस्थानी पारंपरिक पद्धत! दही होईल घट्ट व दाटसर - विकतचे दही जाल विसरुन...
३. शिजवून घेतलेली चणा डाळ मिक्सरला फिरवून वाटून घ्यावी. मग तयार ग्रेव्हीमध्ये, मिक्सरमधील वाटून घेतलेली डाळ घालावी. डाळ मंद आचेवर ५ ते १० मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावी.
५. सगळ्यात शेवटी चिंचेचा कोळ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. डाळ व्यवस्थित हलवून २ ते ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी.
गरमागरम भातावर दालचा घालून त्यावर मस्त कुरकुरीत तळलेला कांदा भुरभुरवून घालावा. परफेक्ट हैद्राबादी चवीचा दालचा खाण्यासाठी तयार आहे.
