Lokmat Sakhi >Food > कडीपत्त्याची चटणी खा रोज, चव जबरदस्त आणि केसही होतील सुंदर! १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

कडीपत्त्याची चटणी खा रोज, चव जबरदस्त आणि केसही होतील सुंदर! १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

Curry leaves chutney recipe: 10-minute healthy chutney: झटपट बनणारी, जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कडीपत्त्याची चटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 17:25 IST2024-06-14T09:00:00+5:302025-06-13T17:25:02+5:30

Curry leaves chutney recipe: 10-minute healthy chutney: झटपट बनणारी, जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कडीपत्त्याची चटणी

how to make curry leave chutney at Home simple and easy 10 minutes recipe benefits for hair | कडीपत्त्याची चटणी खा रोज, चव जबरदस्त आणि केसही होतील सुंदर! १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

कडीपत्त्याची चटणी खा रोज, चव जबरदस्त आणि केसही होतील सुंदर! १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी

गरमागरम वरण भातासोबत चवीला आपण लोणचे-पापड नेहमीच खातो. (Curry leaves chutney recipe) जेवताना तोंडी लावण्यासाठी आपल्याला सतत चटक-मटक पदार्थ हवे असतात.(10-minute healthy chutney) ताटाच्या डाव्या बाजूला चटणी, पापड, लोणचे कुरडई असे पदार्थ असले की जेवणाची रंगत आणखी वाढते. (How to make curry patta chutney)महाराष्ट्रातील अनेक भागात विविध प्रातांनुसार चटण्या बनवल्या जातात. यातील काही चटण्या आपल्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाच्या आहे. (Curry leaves benefits for hair)
कडीपत्ता आरोग्यासाठी चांगला मानला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण भाजीपासून अनेक डाळीपर्यंत अनेक पदार्थांना कडीपत्त्याची फोडणी देतो. परंतु काही लोक कडीपत्ता पदार्थातून वगळतात. आपल्या शरीराच्या पोषणासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी कडीपत्ता बहुगुणी मानला जातो. जर तुम्हाला केस-त्वचेच्या समस्या उद्भवत असतील तर कडीपत्त्याची चटणी खा. आरोग्यासाठी हेल्दी असणारी ही चटणी कशी बनवायाची पाहूया. 

पालकाची भाजी पाहून मुले नाक मुरडतात? बनवा खमंग - कुरकुरीत पालक वडी, झटपट होणारा चविष्ट पदार्थ

साहित्य 

कडीपत्ता - १ कप 
तेल - १ चमचा 
शेंगदाणे - अर्धा कप 
लसूण पाकळ्या - १० ते १५
जिरे - १ चमचा 
तीळ - १/४ कप 
कश्मिरी लाल मिरची - ८ ते १० 
आमचूर पावडर - २ चमचे
सुके खोबरे - १/४ कप 
मीठ - चवीनुसार 


 

कृती

1. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात तेल घाला. तेल चांगले गरम झाल्यावर कडीपत्ता भाजून घ्या. 

2. त्यानंतर शेंगदाणे, सुकलेल्या लाल मिरच्या, लसूण पाकळ्या, सुके खोबरे, तीळ, जिरे चांगले भाजा. 

3. वरुन आमचूर पावडर घालून पुन्हा एकदा परतवून घ्या. 

4. मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये कडीपत्ता आणि मीठ घालून वाटून घ्या.  तयार होईल चटपटीत कडीपत्ता चटणी. 

Web Title: how to make curry leave chutney at Home simple and easy 10 minutes recipe benefits for hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.