Join us
Daily Top 2Weekly Top 5

Christmas 2025 : ना ओव्हन - ना केक मोल्ड! मसाल्याच्या डब्यात करा भारी कप केक्स - पाहा इन्स्टंट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2025 15:28 IST

how to make cup cake in spice box : homemade cupcake without oven : cupcake without mold : cupcake without cupcake tray : कोणताही साचा किंवा मोल्डन वापरता इन्स्टंट पद्धतीने झटपट कप केक्स कसे तयार करायचे याची सोपी ट्रिक...

नाताळचा सण म्हटलं की मुलांची पहिली मागणी असते ती म्हणजे केकची! घराघरात ख्रिसमसची तयारी सुरू झाली आहे. आनंद, रंगीबेरंगी सजावट आणि लहान मुलांचा खास आवडीचा गोड पदार्थ केक याशिवाय ख्रिसमस अधूराच आहे. ख्रिसमस निमित्त घराघरांत छान, मऊ - लुसलुशीत असा स्पॉंजी केक हमखास तयार केला जातो. पण घरच्याघरीच मुलांसाठी कप केक तयार करायचा म्हटलं तर, केक टिन किंवा मोल्ड अशी सगळी जय्यत तयारी करावी लागते.  अनेकदा कप केक तयार करण्याची इच्छा असते, पण साचे उपलब्ध नसल्यामुळे आपण बेत रद्द करतो. परंतु जर आपल्याकडे कप केक तयार करण्यासाठी केक टिन किंवा मोल्ड नसेल तर स्वयंपाकघरातील मसाल्याचा किंवा फोडणीचा डबा वापरूनही आपण मऊ आणि लुसलुशीत कप केक तयार करु शकतो(how to make cup cake in spice box).

कप केक तयार करण्यासाठी महागड्या ओव्हनची किंवा फॅन्सी मोल्ड्सची गरज असतेच असं नाही. काहीवेळा आपल्या साध्या घरगुती वस्तूही 'मॅजिक' करू शकतात. यंदा ख्रिसमस निमित्त खास मुलांसाठी कप केक्स करायचा बेत असेल तर आपण चक्क फोडणीच्या डब्याचाही वापर करु शकतो... ऐकायला थोडे वेगळे वाटेल, पण या पद्धतीनं केक अगदी झटपट आणि उत्तम आकाराचे तयार होतात. अगदी कमी साहित्यात, फारशी मेहेनत न घेता किंवा कोणताही साचा किंवा मोल्डचा वापर न करता इन्स्टंट पद्धतीने झटपट कप केक्स (homemade cupcake without oven) कसे तयार करायचे याची सोपी ट्रिक पाहूयात. 

फोडणीच्या डब्यातही करता येतील इन्स्टंट कप केक्स... 

साहित्य :- 

१. गूळ - १ कप २. कॉफी पावडर - १ टेबलस्पून ३. कोको पावडर - १ टेबलस्पून४. तेल - १/२ कप ५. मिल्क पावडर - १ टेबलस्पून६. दूध - १ कप ७. गव्हाचे पीठ - १ कप ८. मीठ - चवीनुसार९. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून १०. बेकिंग पावडर - १/२ टेबलस्पून ११. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून १२. ड्रायफ्रुटसचे काप - १/२ कप 

इडली पात्र किंवा स्टॅन्ड नाही! कुकर आणि ग्लासमध्येच करा १५ मिनिटांत गुबगुबीत - जाळीदार पांढरीशुभ्र इडली... 

उरलेल्या बेरीतूनही निघेल वाटीभर साजूक तूप! पाहा भन्नाट ट्रिक - रवाळ, दाणेदार तुपाची चवच भारी... 

कृती :- 

१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात किसलेला गूळ, कॉफी पावडर, कोको पावडर, तेल, मिल्क पावडर, दूध असे सगळे जिन्नस एकत्रित घालावे. मिक्सरमध्ये सगळे जिन्नस फिरवून केकचे बॅटर तयार करून घ्यावे. २. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं बॅटर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. मग यात गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे सगळे जिन्नस बारीक जाळीदार गाळणीतून गाळून तयार केक बॅटरमध्ये घालावे. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 

३. सगळ्यात शेवटी केक बॅटरमध्ये थोडे गरजेनुसार दूध घालून बॅटरची कंन्सिस्टंसी व्यवस्थित सेट करून घ्यावी. ४. फोडणीच्या डब्यांतील छोट्या छोट्या वाट्यांना आतून किंचितसे साजूक तूप लावून घ्यावे. मग यात तयार केक बॅटर घालून वरून आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटसचे काप घालावेत. ५. एका मोठ्या पसरट व खोलगट कढईच्या तळाशी थोडे मीठ किंवा वाळू घालून एक पातळसर थर तयार करून घ्यावा. त्यावर जाळी ठेवून मग हा केकचे बॅटर भरलेला फोडणीचा डबा त्यात ठेवावा आणि वरून झाकण ठेवून झाकून घ्यावे. ६. ४५ मिनिटे मध्यम आचेवर केक व्यवस्थित बेक करून घ्यावा. 

ना कोणताही ओव्हन किंवा ना कोणताही मोल्ड किंवा साच्याचा वापर करून मसाल्याच्या डब्यांत होणारे इन्स्टंट कप केक खाण्यासाठी तयार आहेत. आपण त्यावर आपल्या आवडीनुसार, चॉकलेट सिरप घालून केक खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.   

English
हिंदी सारांश
Web Title : Christmas Cupcakes: Bake Delicious Treats Using a Spice Box, No Oven Needed!

Web Summary : Make soft, delicious cupcakes this Christmas without an oven or molds! Use a spice box for baking. This instant recipe uses simple ingredients like jaggery, wheat flour, and dry fruits. Bake in a कढ़ाई with salt for 45 minutes. Enjoy homemade cupcakes with chocolate syrup!
टॅग्स :अन्नपाककृतीनाताळ