Join us  

घरी केलेले वेफर्स काळे पडतात? यंदा उन्हाळ्यात करा पांढरेशुभ्र वेफर्स, पाहा ही युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 12:48 PM

How to make Crispy Thin Potato Chips - Batata Wafers : तेलात तळताना दुप्पट फुलणारे बटाटे वेफर्स तयार होतील घरीच, वाळवण्यासाठी गच्चीवरही जाण्याची गरज नाही

लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला बटाट्याचे वेफर्स खायला आवडतात. उपवासाला बरेच जण बटाट्याचे वेफर्स खातात. पण बाजारात मिळणारे वेफर्स हे कोणत्या तेलात तळले जातात, हे आपल्याला ठाऊक नसते. त्यामुळे बरेच जण विकतचे बटाट्याचे वेफर्स खाताना थोडा विचार करतात. पण विकतचे वेफर्स खाण्यापेक्षा आपण घरातच वाळवणाचे बटाट्याचे वेफर्स तयार करून ठेऊ शकता (Potato Chips).

बऱ्याचदा बटाट्याचे वेफर्स काळे पडतात, किंवा साठवून ठेवल्यास अधिक महिने टिकत नाही. जर आपले देखील बटाट्याचे वेफर्स पांढरेशुभ्र आणि अधिक काळ टिकावे असे वाटत असेल तर, एक ट्रिक वापरून घरगुती वाळवणाचे बटाट्याचे वेफर्स तयार करा (Cooking Tips). मेहनत न घेता बटाट्याचे वेफर्स तयार होतील, शिवाय अधिक महिने आरामात फ्रेश टिकतील(How to make Crispy Thin Potato Chips - Batata Wafers).

वाळवणाचे बटाट्याचे वेफर्स करण्यासाठी लागणारं साहित्य

बटाटे

पाणी

मीठ

कोशिंबीर नेहमीचीच, करून पाहा काकडीचा खमंग ढोकळा; इतका कुल की असा ढोकळा आवडेल सर्वांना

तुरटी

कृती

सर्वप्रथम, मोठ्या आकाराचे बटाटे घ्या. पिलरने बटाट्याचे साल सोलून काढा. नंतर चिप्स मेकरवर बटाटा ठेवून त्याचे पातळ चकत्या एका परातीत पाडून घ्या. परातीमध्ये बटाट्याचे पातळ चकत्या पाडून झाल्यानंतर त्यात पाणी घालून धुवून घ्या. जोपर्यंत बटाट्यामधून स्टार्च निघत नाही, तोपर्यंत पाणी घालून धुवून घ्या.

दुसरीकडे एका परातीमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये तुरटीचा एक खडा फिरवा. त्यामध्ये बटाट्याचे चकत्या घालून ठेवा. यामुळे चिप्स काळे पडणार नाही. आता एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा मीठ घाला. पाण्याला उकळी येण्याआधी त्यात तुरटीचा खडा फिरवा, व त्यात बटाट्याचे चकत्या घाला. गॅसची फ्लेम हाय ठेवा, व चिप्स अर्धे कच्चे होईपर्यंत शिजवून घ्या, व चाळणीमध्ये बटाट्याचे चकत्या घालून पाणी निथळून घ्या.

नितीन गडकरींनी सांगितली दही वांग्याच्या कापांची हटके-सिंपल रेसिपी, चवीला जबरदस्त

घरातच फॅनखाली आपण चिप्स वाळत घालू शकता. यासाठी सुती कापड फॅनखाली पसरवा. त्यावर सुटसुटीत वेफर्स पसरवून ठेवा. दोन ते तीन दिवसात घरातच वेफर्स वाळतील. आपण हे चिप्स हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. शिवाय हे चिप्स कायम पांढरीशुभ्र राहतील. काळे पडणार नाही. कधीही खाण्याची इच्छा झाल्यास, आपण तळून चिप्स खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स