लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना जंक फूड खायला अधिक प्रमाणात आवडते. पावसाळ्यात चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खायला आवडतात.(Suran fries recipe) कांदा भजी- वडापाव यांसारखे पदार्थ जिभेवर कायम रेंगाळत असतात.(Monsoon snacks ideas) पण सगळ्यांना आवडणारा पदार्थ फ्रेंच फ्राइज. फ्राइज म्हटलं की लगेच आठवतो तो बटाटा. पण रोज-रोज बटाट्याचे फ्राइज खाल्ले की कंटाळा येतो.(Healthy fries alternative) तसेच वजन वाढणे, तेलकटपणा आणि आरोग्याच्या समस्या हा तर वेगळाच मुद्दा.म्हणून आजकाल लोक चटपटीत पदार्थ खाण्यासाठी हेल्दी पर्याय शोधत असतात आणि हाच पर्याय म्हणजे सुरणाचे फ्राइज.(Homemade Suran fries)
सुरणाचे फ्राइज हे दिसायला फास्ट-फूडसारखे, पण खायला अधिक पौष्टिक लागतात.मुलांना स्नॅक्स म्हणून द्यायचे असतील, किंवा पाहुण्यांसाठी झटपट काहीतरी खास बनवायचं असेल तर हा पर्याय एकदम परफेक्ट. (Quick Suran fry recipe) पावसाळ्यात जर संध्याकाळच्या नाश्त्यात हेल्दी काही बनवायचे असेल तर सुरणाचे फ्राइज ट्राय करु शकता.
अण्णाकडे मिळतो तसा कुरकुरीत दालवडा घरीच करण्याची ट्रिक, रेसिपी सोपी आणि वड्याची चव म्हणजे अहाहा
साहित्य
सुरण - १ मोठे
तेल - तळण्यासाठी
मीठ - चवीनुसार
पाणी - आवश्यकतेनुसार
दही - १ वाटी
जिरे - १ चमचा
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या - २ ते ३
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी सुरण व्यवस्थित धुवून घ्या. नंतर गोल आकारात कापून घ्या. बाजूने व्यवस्थित त्याचे सालं काढून घ्या. यानंतर सुरणाचे एका आकारात काप करा. आणि १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजवा. यामुळे सुरणातील घाण निघून जाण्यास मदत होईल.
2. आता गॅसवर पातेल ठेवून त्यात पाणी आणि मीठ घाला. उकळी आल्यानंतर सुरणाचे काप त्यात घालून चांगले वाफवून घ्या. ५ मिनिटानंतर सुरण ताटात काढून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल व्यवस्थित गरम करुन घ्या. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर वाफवलेल्या सुरणाचे काप तळून घ्या. ताटात टिश्यू पेपर ठेवून सुरण त्यावर पसरवून घ्या.
3. क्रिमी डीप बनवण्यासाठी एका कॉटनच्या कपड्यात दही घालून त्यातील सगळे पाणी काढून घ्या. त्यानंतर फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात जिरे आणि मिरची घालून तडतडू द्या. यानंतर दह्याच्या मिश्रणाला एका वाटीत घेऊन त्यात तयार फोडणी घाला. वरुन कोथिंबीर आणि मीठ घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करुन घ्या. गरमागरम सुरणाचे फ्राइज यासोबत खा. चवीलाही अगदी मस्त लागतात. यावर आपण चीज किंवा मसाला घालून त्याची टेस्ट वाढवू शकतो.