Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पालकची भजी तेलकट-कडक होतात? सोपी ट्रिक- १० मिनिटांत होतील पालकची कुरकुरीत-खमंग भजी, सोपी रेसिपी

पालकची भजी तेलकट-कडक होतात? सोपी ट्रिक- १० मिनिटांत होतील पालकची कुरकुरीत-खमंग भजी, सोपी रेसिपी

Crispy spinach bhaji: Palak bhaji recipe: पालकची कुरकुरीत, खमंग भजी कशी करायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 09:30 IST2025-11-21T09:30:00+5:302025-11-21T09:30:02+5:30

Crispy spinach bhaji: Palak bhaji recipe: पालकची कुरकुरीत, खमंग भजी कशी करायची पाहूया.

How to make crispy spinach fritters without getting oily Best trick to make crunchy palak bhaji at home Quick 10-minute palak bhaji | पालकची भजी तेलकट-कडक होतात? सोपी ट्रिक- १० मिनिटांत होतील पालकची कुरकुरीत-खमंग भजी, सोपी रेसिपी

पालकची भजी तेलकट-कडक होतात? सोपी ट्रिक- १० मिनिटांत होतील पालकची कुरकुरीत-खमंग भजी, सोपी रेसिपी

हिवाळ्यात आपल्याला बाजारात सर्वत्र हिरव्या भाज्या दिसू लागतात. या काळात स्वयंपाकघरातून एक वेगळीच चव, सुगंध आणि उब देखील पाहायला मिळते.(Crispy spinach bhaji) शरीराला गरम, खमंग आणि पोटभरीचा आहार हवा असतो.( Palak bhaji recipe) पालकची भाजी ही फारशी कुणाला आवडत नाही. वातावरणातील गारव्यामुळे आपल्याला गरमागरम आणि शरीराला उब देणारे पदार्थ खाण्याची इच्छा होते.(Crunchy fritters trick) अशावेळी संध्याकाळच्या नाश्त्यात आवर्जून केला जाणारा पदार्थ असतो भजी.(Indian snacks recipe)
पालक म्हटलं की सगळेच नाक मुरडतात. पण मुलांना काही पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ खाऊ घालायचे असतील तर आपण पालक-बटाटा भजी नक्की ट्राय करु शकतो.(Winter snacks recipe) या दोघांचा आस्वाद चवीला मस्त लागतो. थंडीच्या दिवसात ही भजी बाहेरुन मस्त, कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. हिवाळ्यात पालक ताजा, हिरवा आणि पौष्टिक मिळतो. त्यामुळे या हिरव्या पानांच्या भाजीचे उपयोगही घराघरात वाढतात. पालकची कुरकुरीत, खमंग भजी कशी करायची पाहूया. 

थंडीमुळे जास्वंदाचे रोप सुकले- पाने पिवळी पडली? मातीत घाला ४ खते, येतील भरपूर कळ्या- फुलांनी बहरेल रोप

साहित्य 

पालक - १ जुडी
कोथिंबीर - १ वाटी 
हिरव्या मिरच्या - ३ 
आल्याचे तुकडे - २ 
लसूण पाकळ्या - ५ ते ६
उकडवलेले बटाटे - ३ 
बेसनाचे पीठ - १ कप 
लाल मिरची पावडर - १ चमचा 
हळद - १ चमचा 
धणे पावडर -१ चमचा 
तीळ - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
तेल - आवश्यकतेनुसार 
पाणी - आवश्यकतेनुसार 

सावळा गं रंग माझा...! शोभून दिसतात ७ रंगांच्या साड्या, खुलून दिसतो लूक- चेहऱ्यावरही येईल चकाकी

कृती 

1. सगळ्यात आधी पालकची जुडी स्वच्छ करुन त्याचे देठ काढून टाका. नंतर बारीक चिरुन घ्या. दोन पाण्याने स्वच्छ धुवा. आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, आले, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या घालून पेस्ट तयार करा. 

2. मोठ्या बाऊलमध्ये पाणी घालून उकळण्यास ठेवा. बटाट्याचे वरचे साल काढून वाफवण्यास ठेवा. चिरलेला पालक, उकडून मॅश केलेला बटाटा, बेसनाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, धणे पावडर, तीळ, मीठ आणि पाणी घालून भजीचे मिश्रण तयार करा. 

3. आता गॅसवर तेल गरम करुन मंद आचेवर भजी कुरकुरीत तळून घ्या. वरुन दही किंवा चिंच चटणी घालून खा. 


Web Title : 10 मिनट में बनाएँ स्वादिष्ट और कुरकुरी पालक भाजी।

Web Summary : इस सर्दी में घर पर स्वादिष्ट और कुरकुरी पालक भाजी बनाएं! यह रेसिपी पालक, आलू और साधारण मसालों का उपयोग करके एक उत्तम नाश्ता बनाती है।

Web Title : Crispy and tasty Palak Bhaji recipe in 10 minutes.

Web Summary : Make delicious and crispy Palak Bhaji at home this winter! This recipe uses spinach, potatoes, and simple spices for a perfect snack.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.