हिवाळा आला की वातावरणात गारवा तयार होतो. तसेच आरोग्याच्या कुरबुरी देखील वाढतात. पण शरीराला पौष्टिक आणि ऊर्जा देणारे पदार्थ खाण्याची गरज अधिक वाढते.(Spinach cutlet recipe) या काळात हिरव्या पालेभाज्या बाजारात सहज पाहायला मिळतात.(Healthy winter snacks) अनेक आजारांवर आणि आरोग्यासाठी बहुगुणी असणारी पालक आपल्या सर्वांना माहितच आहे.(Breakfast recipe) पालक खाताना मुल नाक मुरडतात.(Crispy spinach patties) पण यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात आढळते. तसेच पालक शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर करते.(Nutritious breakfast recipe)
मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि हाड मजबूत करण्यासाठी आपण हिरव्यागार पालकाचे कुरकुरीत कटलेट ट्राय करायला हवे.(Winter special recipes) हे कटलेट कसे बनवायचे पाहूया, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहा.
साहित्य
बारीक चिरलेला पालक - १ मोठी वाटी
बारीक चिरलेले आले- १ इंच
बारीक चिरलेली हिरवी मिरची - १
बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या - २ ते ३
उकडलेले बटाटे- ४ ते ५
मीठ - चवीनुसार
गरम मसाला - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
चिली फ्लेक्स - १ चमचा
काळी मिरी - १ चमचा
ब्रेड क्रम्स - आवश्यकतेनुसार
कॉर्न फ्लोअर - १ चमचा
मैदा - १ चमचा
तेल - तळण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला पालक स्वच्छ धुवून व्यवस्थित चिरुन घ्यावा लागेल. त्यानंतर बटाटे उकडवून घ्या. आता कढईवर पॅन गरम करुन त्यावर तेल घाला. त्यात आले, हिरवी मिरची आणि लसूण घालून चांगले परतवून घ्या. बारीक चिरलेला पालक घालून मंद आचेवर शिजवून घ्या.
2. शिजलेल्या पालकची भाजी थंड झाल्यानंतर त्याची प्युरी तयार करा. एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे मॅश करुन घ्या. त्यात पालकाची प्युरी घालून मीठ, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, चिली फ्लेक्स, काळी मिरी, ब्रेड क्रम्स घालून त्याचा गोळा तयार करा.
3. गोळ्याचे गोल आकारात कटलेट तयार करा. त्याला मैदा आणि कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये डीप करा. ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या. कढईत तेल गरम करुन मंद आचेवर तळून घ्या. तयार होईल गरमागरम पालकाचे कटलेट.
