Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैद्याचं कुरकुरीत आवरण आणि सत्तूचं सारण! १० मिनिटांत करा बाहेरुन कुरकुरीत, आतून खुसखुशीत कचोरी - सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 11:35 IST

Sattuchi kachori recipe marathi: Khushkhushit kachori kashi banvaychi: 10 mintat kurkurit kachori: काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर आपणही घरच्या घरी अगदी हलवायासारखी खुसखुशीत सत्तूची कचोरी बनवू शकतो. पाहूया सोपी रेसिपी

सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो. एखादी निवांत संध्याकाळ, गरमागरम आणि कुरकुरीत कचोर समोर आली की भूक द्विगुणित होते. आपण आजवर मुगाच्या डाळीची किंवा कांद्याची कचोरी अनेकदा खाल्ली असेल, पण 'सत्तूची कचोरी' ही चवीच्या दुनियेतील एक वेगळीच मेजवानी आहे.(Sattuchi kachori recipe marathi) बिहार आणि उत्तर प्रदेशात अत्यंत लोकप्रिय असलेली ही कचोरी आता हळूहळू जगभरातील खाद्यप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. बाहेरून मैद्याचे अतिशय कुरकुरीत आवरण आणि आतमध्ये चटपटीत, प्रथिनांनी समृद्ध असलेल्या सत्तूचे सारण जिभेवर चव निर्माण करते. (Khushkhushit kachori kashi banvaychi)अनेकदा गृहिणींना तक्रार असते की घरची कचोरी हॉटेलसारखी फुगत नाही किंवा ती थोड्या वेळाने मऊ पडते. पण योग्य पद्धत आणि काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर आपणही घरच्या घरी अगदी हलवायासारखी खुसखुशीत सत्तूची कचोरी बनवू शकतो. पाहूया सोपी रेसिपी (10 mintat kurkurit kachori)

काखेतील काळपटपणा- दुर्गंधीपासून मिळेल सुटका! १० रुपयांत घरीच करा नॅचरल रोल-ऑन, घामाचा वासही होईल कमी

साहित्य 

मैदा - अर्धा कप ओवा - २ चमचेकाळे तीळ - १ चमचा मीठ - चवीनुसार तेल - आवश्यकतेनुसार पाणी - आवश्यकतेनुसार जिरे  - १ चमचा बडीशेप - १ चमचा कांद्याच्या बिया - १ चमचा हिंग - १ चमचा आले-मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १ चमचाधने पावडर - १ चमचा सत्तूचे पीठ - अर्धा कप टलाल मिरची पावडर - १ चमचा गरम मसाला - १ चमचा लिंबाचा रस - अर्धा चमचा दही - २ चमचे 

कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये मैदा, ओवा, काळे तीळ, चमचाभर तेलाचे मोहन घालून एकजीव करा. नंतर पाणी घालून पीठ मळून घ्या. ओल्या कापडाने हे पीठ झाकून घ्या. 

2. आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करा. त्यात जिरे, बडीशेप, कांद्याच्या बिया, हिंग, आले-मिरची पेस्ट, हळद, धने पावडर घालून चांगले परतवून घ्या. त्यात सत्तूचे पीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, लिंबाचा रस घालून पुन्हा परतवून घ्या. दही घालून पुन्हा मिश्रण एकजीव करा. सारणाचे छोटे गोळे तयार करा. 

3. मैद्याचा पीठाचा गोळा घेऊन त्यात सत्तूचे तयार सारण भरा. त्याची छोटी जाडसर पुरी लाटा. कढईमध्ये तेल गरम करुन घ्या, मंद आचेवर कचोरी तळून घ्या. हिरव्या चटणी किंवा सॉससोबत खा सत्तूची कचोरी.  

English
हिंदी सारांश
Web Title : Crispy Sattu Kachori Recipe: Quick, Easy, and Delicious Snack

Web Summary : Sattu Kachori, a popular snack from Bihar and Uttar Pradesh, features a crispy maida crust and a protein-rich sattu filling. This recipe provides easy steps and tips to make it at home, ensuring a flaky and flavorful result perfect for any time.
टॅग्स :अन्नपाककृती