Join us

मशीनशिवाय करा वाटीभर साबुदाण्याचे कुरकुरीत कुरकुरे! घरच्याघरी चटपटीत-झणझणीत विकतपेक्षाही भारी कुरकुरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 09:05 IST

sabudana kurkure recipe: how to make sabudana kurkure at home: साबुदाण्याच्या पिठापासून आपण कुरकुरीत कुरकुरे बनवू शकतो.

लहान मुलांचा आवडीचा खाऊ म्हणजे कुरकुरे. अगदी चवीने आणि आवडीने हा पदार्थ खातात. काही तरी चटपटीत किंवा वेगळ खाण्याची इच्छा झाली की कुरकुरे हा ऑप्शन आपल्या डोळ्यांसमोर हमखास येतो.(sabudana kurkure recipe) कुरकुरेमध्ये देखील अनेक वेगवेगळे फ्लेवर पाहायला मिळतात.(how to make sabudana kurkure at home) पण विकतचे कुरकुरे अतिप्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला हानी देखील पोहचू शकते. (homemade sabudana snacks)एक वाटी साबुदाण्याच्या पिठापासून आपण कुरकुरीत कुरकुरे बनवू शकतो.(crunchy kurkure recipe at home) दिसायला आकर्षित आणि चवीला चटपटीत लागतात. बनवणे देखील अगदी सोपे आहे.(sabudana kurkure step by step) हे कुरकुरे आपण उपवासाला देखील खाऊ शकतो. उपवासात नेहमी तेच ते पदार्थ खाताना आपल्याला कंटाळा येतो. अशा वेळी नक्की ट्राय करा.(easy sabudana snack recipe) अगदी कमी साहित्यात वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आपण याची चव चाखू शकतो. पाहूयात याची सोपी रेसिपी. 

कुरकुरीत- चटपटीत कच्च्या केळीचे काप, १० मिनिटांत होईल चविष्ट तिखट पदार्थ

साहित्य 

साबुदाणा - १ कप उकडलेला बटाटा - १ मीठ - आवश्यकतेनुसार काळीमिरी पावडर - चवीनुसार तेल - तळण्यासाठी लाल तिखट - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी साबुदाणा मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करा. 

2. आता एका भांड्यामध्ये वाटलेले साबुदाण्याचे पीठ, उकडलेला बटाटा, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून त्याचे पीठ मळून घ्या. 

3. पिठाला हाताने कुरकुऱ्याचा आकार द्या, कढईमध्ये तेल गरम करुन कुरकुरे तळून घ्या. 

4. आपण हे असेच खाऊ शकतो किंवा यात लाल तिखट मसाला घालून याची चव वाढवू शकतो. 

5. कुरकुरे अधिक टेस्टी करण्यासाठी आपण त्यात वेगवेगळे फ्लेवर घालू शकतो.  

टॅग्स :अन्नपाककृती