Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > वाळवणाचे पदार्थ करायचेत पण गॅस नाही? करा पोह्यांचे कुरकुरीत बॉबी पापड - ना गॅसची गरज तरीही होतील चविष्ट...

वाळवणाचे पदार्थ करायचेत पण गॅस नाही? करा पोह्यांचे कुरकुरीत बॉबी पापड - ना गॅसची गरज तरीही होतील चविष्ट...

How To Make Poha Kurkure At Home : poha kurkure recipe without gas : how to make crispy poha kurkure without cooking gas : गॅस संपला तरीही करता येईल असा वाळवणाचा खास पदार्थ म्हणजे पोह्यांचे कुरकुरीत बॉबी पापड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 17:05 IST2026-03-18T17:00:15+5:302026-03-18T17:05:02+5:30

How To Make Poha Kurkure At Home : poha kurkure recipe without gas : how to make crispy poha kurkure without cooking gas : गॅस संपला तरीही करता येईल असा वाळवणाचा खास पदार्थ म्हणजे पोह्यांचे कुरकुरीत बॉबी पापड...

how to make crispy poha kurkure without cooking gas poha kurkure recipe without gas How To Make Poha Kurkure At Home | वाळवणाचे पदार्थ करायचेत पण गॅस नाही? करा पोह्यांचे कुरकुरीत बॉबी पापड - ना गॅसची गरज तरीही होतील चविष्ट...

वाळवणाचे पदार्थ करायचेत पण गॅस नाही? करा पोह्यांचे कुरकुरीत बॉबी पापड - ना गॅसची गरज तरीही होतील चविष्ट...

सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे आणि युद्धजन्य वातावरणामुळे गॅस टंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. दुसरीकडे, कडक उन्हाळा सुरू झाला असून गृहिणींची 'वाळवणाचे पदार्थ' तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. पापड, कुरडई, सांडगे…असे अनेक वाळवणाचे पदार्थ हमखास घरोघरी मोठ्या हौसेनं तयार केले जातात. वाळवणाच्या पदार्थांची वर्षभराची साठवणूक करायची तर गॅसचा वापर करावाच लागतो. पण गॅस टंचाईच्या या काळात "गॅस न वापरता वाळवण कसं करायचं?" असा प्रश्न अनेक गृहिणींना पडलाच असेल...पण काळजी करण्याची गरज नाही! कारण काही असेही पारंपरिक आणि सोपे पदार्थ आहेत, जे गॅस न वापरता देखील सहज तयार करता येतात. त्यातलाच एक भन्नाट आणि झटपट होणारा पदार्थ म्हणजे पोह्यांचे बॉबी पापड किंवा कुरकुरे(How To Make Poha Kurkure At Home)

कमी साहित्य, कमी मेहनत आणि गॅसशिवाय तयार होणारा हा पदार्थ तुमच्या वाळवणाच्या यादीत नक्कीच परफेक्ट ठरेल. पोह्यांचे बॉबी पापड किंवा कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला तासंतास गॅससमोर उभं राहण्याची किंवा गॅस खर्च करण्याची अजिबात गरज नाही. फक्त काही घरगुती साहित्य वापरून तुम्ही हे कुरकुरीत पोह्यांचे बॉबी पापड (how to make crispy poha kurkure without cooking gas) झटपट तयार करू शकता. गॅस न पेटवता वर्षभरासाठी साठवणीचे पोह्यांचे बॉबी पापड किंवा कुरकुरे करण्याची सहजसोपी आणि इन्स्टंट रेसिपी पाहूयात... 

साहित्य :- 

१. पोहे - १/२ किलो 
२. पाणी - गरजेनुसार
३. मीठ - चवीनुसार
४. पापड खार - १ टेबलस्पून
५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
६. चिलीफ्लेक्स - १ टेबलस्पून

पोह्याचं थालीपीठ करा फक्त १० मिनिटांत, आई भूक लागली काहीतरी मस्त कर म्हणणारी मुलंही होतील खुश...


डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्न भाटियाचे फिटनेस कोच सांगतात-पुरी खाण्याचं तंत्र...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात पोहे घेऊन ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. 
२. पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्यात गरजेनुसार ग्लासभर पाणी घालून अर्धा तास हे पोहे व्यवस्थित भिजण्यासाठी झाकून ठेवावेत. 
३. अर्ध्या तासानंतर थोडं थोडं पाणी गरजेनुसार घालून हाताने हलकेच दाब देत हे पोहे व्यवस्थित मळून घ्यावेत. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. 

ऊस न वापरता घरीच करा रसवंतीसारखा उसाचा रस-पाहा सोपी रेसिपी-उन्हाळ्यासाठी गारेगार युक्त...

४. मळून लगदा झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ, पापड खार, लाल तिखट मसाला घालावा. सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावं. 
५. तयार मिश्रण एका पायपिंग बॅग मध्ये किंवा मेहेंदीच्या कोनासारखी एक पिशवी तयार करून त्यात भरून घ्यावं. पिशवीचे खालचे टोक कापून घ्यावं. 
६. मग प्लास्टिक किंवा सुती कापड अंथरुन त्यावर पायपिंग बॅगच्या मदतीने हे पोह्यांचे बॉबी कुरकुरे घालावेत. ३ ते ४ दिवस व्यवस्थित उन्हांत वाळवून घ्यावेत. 
७. व्यवस्थित वाळून झाल्यावर हे पोह्यांचे बॉबी कुरकुरे एका हवाबंद डब्यांत भरुन स्टोअर करुन ठेवावेत. 

पोह्यांचे हे इन्स्टंट बॉबी कुरकुरे आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेऊ शकतो. आपल्याला हवे तेव्हा आपण तेलात तळून हे कुरकुरीत बॉबी कुरकुरे खाऊन शकतो.

Web Title : बिना गैस के बनाएं: कुरकुरे पोहा पापड़ - आसान और स्वादिष्ट!

Web Summary : गैस के बिना कुरकुरे पोहा पापड़ बनाएं! यह आसान रेसिपी कम सामग्री का उपयोग करती है। भिगोएँ, पीसें, मसाले डालें, आकार दें और सुखाएँ। साल भर आनंद लेने के लिए स्टोर करें।

Web Title : Gas-free Recipe: Crispy Poha Papad – Easy & Delicious!

Web Summary : Make crispy poha papad without gas! This easy recipe uses minimal ingredients. Soak, grind, add spices, shape, and dry. Store for year-round enjoyment.