सुट्टीच्या दिवशी काय बनवायचे असा प्रश्न घरातील प्रत्येक महिलेला पडतो.(patta gobhi cutlet recipe) पोहे, उपमा, रवा खाऊन घरच्यासह आपल्यालादेखील वैताग येतो.(cabbage vada recipe) ऑनलाइन काही ऑर्डर करायचे म्हटले तर ते काही शक्य नसते. आठवड्यातला एकतरी दिवस असा असो ज्यादिवशी स्पेशल नाश्ता घरात बनवला जातो. तो म्हणजे सुट्टीचा दिवस. (healthy snacks recipe)मुलांना सुट्टी असल्यामुळे त्यांच्या पोटात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ जावे असे प्रत्येक आईला वाटतं असते.(cabbage cutlet without deep fry) लहान मुलांना चायनिस-नूडल्स जास्त आवडत. नुसती कोबीची भाजी खायला नाक मुरडतात पण नुडल्स किंवा चायनिजमध्ये कोबी असली की ती आवडीने खातात.(crispy patta gobhi cutlet recipe at home) आतापर्यंत आपण कोबीची भाजी, पराठा, भजी, मच्युरिअनची चव चाखली असेलच आज आपण नाश्त्यामध्ये कोबीचे कुरकुरीत कटलेट ट्राय करु शकतो. चवीला एकदम टेस्टी आणि करायला एकदम सोपे आहेत पाहूया रेसिपी.
घरगुती झणझणीत कांदा-लसूण मसाला करण्याची पारंपरिक पद्धतीची रेसिपी, ५ किलोसाठी अचूक प्रमाण
साहित्य
कोबी - १ खोबऱ्याचे काप - १ कप आले - १ इंच चिंच लाल मिरची पावडर - १ चमचा हळद - १ चमचाधने पावडर - १ चमचा जिरे पावडर - १/२ चमचा चिरलेला कांदा - १ कपचिरलेला कोथिंबीर - आवश्यकतेनुसार तांदळाचे पीठ - १/२ कप रवा तेल
कृती
1. सगळ्यात आधी कोबी व्यवस्थित उभी बारीक कापा किंवा किसून धुवून घ्या. मीठ घालून चांगले मिक्स करुन घ्या. दाबून त्यातील पाणी बाहेर काढा.
2. आता मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे काप, आले, चिंच, लाल मिरची पावडर, हळदी, धने पावडर, जिरे पावडर घालून वाटून घ्या.
3. कोबीमध्ये बारीक चिरलेला कांदा, वाटलेला मसाला, कोथिंबीर, तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.
4. मिश्रणाचे दोन वेगळे भाग करुन एकामध्ये रवा घालून त्याचे कटलेटचा आकार द्या. वरुन रवा लावून तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्या. चटणी किंवा सॉससोबत आवडीने खा कोबीचे खमंग-कुरकुरीत कटलेट