खाकरा हा पदार्थ आपण कोणत्याही वेळी खाऊ शकतो. चवीला हलका-फुलका, कुरकुरीत आणि चविष्ट असा पदार्थ आहे.(moong dal khakhra recipe) टी-टाइम किंवा छोटी भूक लागली असेल तर आपल्याला सहज खाता येतो. क्रिस्पी खुसखुशीत खाकरा खाण्याची मज्जा देखील वेगळीच. खाकरा म्हटलं की आपण बाजारातून तो विकत आणतो.(green moong dal khakhra) गव्हाच्या पिठापासून तयार केलेला हा पदार्थ चवीलाही तितकाच छान लागतो.(moong dal snacks) यामध्ये विविध फ्लेवर्सची चवही आपल्याला चाखायला मिळते. पण जर आपल्या या टेस्टला वेगळी चव द्यायची असेल तर घरच्या घरी करुन पाहा. सालाच्या मुगाच्या डाळीपासून कुरकुरीत खाकरा.(Gujarati khakhra recipe)
सालाच्या मुगाच्या डाळीचा खाकरा राजस्थानमध्ये बनवला जातो.(homemade khakhra) याला कोरामा का खाकरा किंवा पुरी असं देखील म्हणतात. हिरव्या मुगाच्या डाळीत भरपूर प्रथिने असतात जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात.(crispy moong dal khakhra) आपली पचनसंस्था देखील मजबूत ठेवण्यास मदत करतात. फायबर, आयर्न आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत यात असल्यामुळे हा खाकरा पौष्टिकच नाही तर चविष्ट देखील लागतो.(protein-rich snacks India) वजन कमी करणाऱ्यांसाठी आणि मधुमेह असणाऱ्यांसाठी हा बेस्ट पर्याय आहे. हा खाकरा कसा बनवायचा पाहूया.
विकतच्या कॉर्नफ्लॉअरपेक्षा शुद्ध स्वस्त घरीच करा मक्याचं पीठ, चवीलाही छान आणि टिकेलही भरपूर दिवस
साहित्य
सालाची मुगाची डाळ - १ कप
गव्हाचे पीठ - १ कप
तेल - आवश्यकतेनुसार
लाल मिरच्या - ३ ते ४
लाल मिरची पावडर - १ चमचा
हळद - १ चमचा
मीठ - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
हिंग - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला सालाची मुगाची डाळ स्वच्छ त्याला थोडी जाडसर वाटून घ्या. आता पाण्याने धुऊन घ्या. त्यानंतर ६ ते ७ तास भिजवा. त्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या.
2. मिक्सरच्या भांड्यात लाल मिरच्यांची पेस्ट करुन घ्या. एका मोठ्या भांड्यात भिजवलेली हिरव्या मुगाची डाळ, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, गरम मसाला, हिंग आणि लाल मिरच्यांची पेस्ट, तेल घालून सर्व साहित्य मिक्स करा. त्यात गव्हाचे पीठ घालून व्यवस्थित एकजीव करा.
3. या मिश्रणाचे कणिक मळून घ्या. तेल लावून पुन्हा व्यवस्थित मळून घ्या. कणकेचा गोळा घेऊन त्याची बारीक चपाती लाटा. तवा गरम करुन त्यावर मंद आचेवर खाकरा व्यवस्थित भाजून घ्या.
4. खाकरा भाजताना त्यावर हलका दाब द्या. ज्यामुळे तो चपातीसारखा फुगणार नाही आणि थोडा कुरकुरीत होईल. गरमागरम खाकरा चहा, सॉस किंवा चटणीसोबत खा. शरीरासाठी हेल्दी व पौष्टिक असणारा पदार्थ.
