दाक्षिणात्य पदार्थांमध्ये मेदू वड्याचे स्थान अगदी खास आहे.(Methi vada recipe) रोजच्या सकाळच्या नाश्त्यात इडली, पोहे, उपमा आवडीने खाल्ले जातात.(Medu vada twist) पण रोजच्या नाश्त्यात काहीतरी वेगळं, चविष्ट आणि आरोग्यादायी बनवायचं असेल तर मेदू वड्याला दिलेला हा नवा ट्विस्ट नक्कीच ट्राय करावा. हिवाळा सुरु झाला की बाजारात हिरव्या भाज्या पाहायला मिळतात. त्यातील मेथीच भाजी ही अमृतासमान. (Winter special methi vada) मेथीच्या पानांमध्ये आयर्न, फायबर, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक असल्याने ती पचन सुधारते, रक्तशुद्धी करते आणि शरीराला उष्णता देते.(Crispy vada recipe) जर आपल्यालाही नाश्त्यामध्ये काही नवीन आणि टेस्टी खायचे असेल तर कपभर मेथीच्या भाजीचा कुरकुरीत वडा ट्राय करुन बघा.
डाळ-तांदूळ न भिजवता, न आंबवता; १५ मिनिटांत करा काकडी इडली, कापसाहून मऊ आणि हलकी- पाहा रेसिपी
साहित्य
मेथी - १ जुडी
पोहे - अर्धा कप
बारीक चिरलेला कांदा - २
मीठ - चवीनुसार
साखर - १ चमचा
बडीशेप - १ चमचा
धने - १ चमचा
जीरे - १ चमचा
तीळ - १ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर - १ चमचा
हिंग - अर्धा चमचा
चाट मसाला - अर्धा चमचा
आलं- लसूण पेस्ट - १ चमचा
बेसन - १ कप
पाणी - आवश्यकतेनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी मेथीची भाजी व्यवस्थित धुवून चिरुन घ्या. त्यानंतर पोहे भिजवून चाळणीमधून गाळून घ्या. आता एका बाऊलमध्ये चिरलेली मेथी, भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करा.
2. त्यानंतर खलबत्त्यात जिरे, धणे, बडीशेप कटून घ्या. त्यानंतर बाऊलच्या मिश्रणात कुटलेले मसाले, तीळ, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट, चाट मसाला घालून सर्व साहित्य नीट मिक्स करा. त्यात बेसनाचे पीठ, मीठ आणि पाणी घालून वड्याचे मिश्रण तयार करा. त्यात चमचाभर तेलही घाला.
3. आता कढईत तेल गरम करा. मिश्रणाला मेदू वड्याचा आकार देऊन मंद आचेवर तळून घ्या. तयार होईल गरमागरम कुरकुरीत मेथी वडा. सॉस, दही किंवा हिरव्या चटणीसोबत आवडीने खा.
