Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कोथिंबीरीची वडी करण्यासाठी १ खास टिप, करा हिरव्यागार कोथिंबीरीची करा खमंग-कुरकुरीत वडी

कोथिंबीरीची वडी करण्यासाठी १ खास टिप, करा हिरव्यागार कोथिंबीरीची करा खमंग-कुरकुरीत वडी

Kothimbir vadi: Crispy kothimbir vadi: Maharashtrian snacks: परफेक्ट आणि कमी वेळात कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची असेल तर परफेक्ट प्रमाण पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2025 09:55 IST2025-11-15T09:54:58+5:302025-11-15T09:55:50+5:30

Kothimbir vadi: Crispy kothimbir vadi: Maharashtrian snacks: परफेक्ट आणि कमी वेळात कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची असेल तर परफेक्ट प्रमाण पाहा.

How to make crispy kothimbir vadi at home winter special recipe Secret tips for perfect kothimbir vadi Traditional Maharashtrian recipe | कोथिंबीरीची वडी करण्यासाठी १ खास टिप, करा हिरव्यागार कोथिंबीरीची करा खमंग-कुरकुरीत वडी

कोथिंबीरीची वडी करण्यासाठी १ खास टिप, करा हिरव्यागार कोथिंबीरीची करा खमंग-कुरकुरीत वडी

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात मिळणारी ताजी, हिरवीगार कोथिंबीर स्वयंपाकघरात सुगंध पसरवत असते. (Kothimbir vadi) कोथिंबीरीशिवाय जेवणाला चवच नसते. (Crispy kothimbir vadi) फोडणीसाठी कोथिंबीरीचा वापर सहज केला जातो. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ असतात. (Maharashtrian snacks) ज्यामुळे आपण टेस्टी आणि चविष्ट पदार्थ बनवू शकतो. (Healthy Indian snacks) त्यातील काही पदार्थ खायला आवडतात पण करायला मात्र किचकट. विकत आणून खायचे म्हणजे त्याची चवही अगदी घरच्यासारखी लागत नाही. शिवाय विकतचे पदार्थ खूप तेलकट असतात. 
या ऋतूमध्ये आपण कोथिंबीरची वडी हमखास खातो. पण मनासारखी वडी तयार होत नाहीत. जर आपल्यालाही एकदम परफेक्ट आणि कमी वेळात कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवायची असेल तर परफेक्ट प्रमाण पाहा. 

परफेक्ट वन डिश मिल, डाळ पालक खिचडी; भरपूर प्रोटीन आणि चवीलाही जबरदस्त

                                         
साहित्य 

भिजवलेली चणाडाळ - २ कप 
बारीक चिरलेली कोथिंबीर - ३ कप 
तांदळाचे पीठ - २ चमचे 
चिंच - अर्धा तमता 
लाल मिरची पावडर - अर्धा चमचा 
हिंग - १ चमचा 
आले - २ तुकडे 
लसूण पाकळ्या - १० ते १२ 
जिरे - १ चमचा 
हिरवी मिरची - ६ 
जिरे पावडर - अर्धा चमचा 
ओवा - १ चमचा 
तीळ - १ चमचा 
बेकिंग सोडा - अर्धा चमचा 
लिंबाचा रस - अर्धा चमचा 
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी चणाडाळ रात्रभर भिजत ठेवा. यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चणाडाळ, हिरव्या मिरच्या, आले आणि लसूण घालून जाडसर वाटण तयार करा. 

2. आता एका बाऊलमध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर, तयार चणाडाळीचे वाटण, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, हिंग, ओवा, तीळ, बेकिंग सोडा, लिंबाचा रस, तेल आणि मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करा. 

3. तयार मिश्रणाला उभा आकार देऊन त्यावर तीळ पसरवा.  गॅसवर पातेल्यात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवा. तयार पीठाचे मिश्रण स्टीम करण्यास ठेवा. २० मिनिटानंतर वड्या शिजतील. 

4. वड्यांचे एकसारखे तुकडे करा. कढईत तेल गरम करुन मंद आचेवर वड्या कुरकुरीत तळून घ्या. तयार होईल खंमग, कुरकुरीत कोथिंबीर वडी. 


Web Title : कुरकुरीत कोथिंबीर वडी रेसिपी: परिपूर्ण परिणामांसाठी एक खास टिप

Web Summary : या सोप्या रेसिपीने घरीच कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवा. यात ताजी कोथिंबीर, भिजलेली चणा डाळ आणि मसाले वापरले जातात. वाफवून, कापून, तळून एक चविष्ट नाश्ता तयार करा.

Web Title : Crispy Kothimbir Vadi Recipe: A Special Tip for Perfect Results

Web Summary : Make crispy Kothimbir Vadi at home with this easy recipe. It uses fresh coriander, soaked lentils, and spices. Steam, slice, and fry for a tasty snack.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.