Join us

गरमागरम वरण-भातासोबत खा कारल्याचे मसालेदार कुरकुरीत काप, सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 09:30 IST

crispy bitter gourd recipe : spicy karela fry: karela chips recipe: आपण कारल्याचा रस, कारल्याची भाजी तर खातोच पण तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट होणारे कारल्याचे काप करा.

कारलं तुपात तळून खा, किंवा साखरेत घोळवून खा असं कारल्याबद्दल म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. कारल्याची भाजी किंवा त्यापासून बनवलेला कोणताही पदार्थ अनेकांना आवडत नाही.(crispy bitter gourd recipe) कारल्याचं नाव जरी काढलं तरी अनेकजण नाक मुरडतात. फार कमी लोकांना कारलं खायला आवडते. कारल्याची भजी काय किंवा भाजी काय.. काहीही बनवलं तरी कारलं हे कडूच लागते.(spicy karela fry) कारलं चवीला कडू असलं तरी आरोग्यासाठी ते अतिशय फायदेशीर मानलं जातं.(karela chips recipe) मधुमेह किंवा वजन कमी करणाऱ्यांच्या आहारात कारल्याचा समावेश असतो.(bitter gourd side dish) आपण कारल्याचा रस, कारल्याची भाजी तर खातोच पण तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट होणारे कारल्याचे काप करा.(Indian vegetarian recipes)चव इतकी भन्नाट की, रोज बनवाल. पाहूया सोपी आणि झटपट होणारी रेसिपी. 

घरी विरजण लावलेले दही आंबट होते? १ सोपी ट्रिक - आंबटपणा जाऊन दही होईल घट्ट

साहित्य 

कारले - २ लिंबाचा रस - अर्धा चमचा लाल मिरची पावडर-  १/२ चमचा  कश्मिरी लाल तिखट - १/२ चमचाहळद - १/४ चमचागरम मसाला - १/२ चमचाजिरे- धने पावडर - १/२ चमचाहिंग - चिमुटभरआले-लसूण पेस्ट - १ चमचा कोथिंबीर रवा - २ चमचे तांदळाचे पीठ - दीड चमचा तेल - २ चमचे 

सकाळच्या नाश्त्याला करा चटपटीत पारंपरिक सुशीला, फक्त १० मिनिटांत तयार- चवही भन्नाट

कृती 

1. सगळ्यात आधी कारलं धुवून त्याच्या वरचे साल काढून घ्या. हवं असल्यास त्याच्या बिया देखील काढून शकता. आता कारल्याचे उभे काप करा. एका भांड्यात कारल्याचे काप, मीठ आणि लिंबू पिळून घ्या. हाताने व्यवस्थित चोळून घ्या, ज्यामुळे कारल्यातील कडूपणा निघेल. कारल्यातून निघालेले मीठाचे पाणी फेकून द्या. 

2. कारल्याचे काप दुसऱ्या भांड्यात घेऊन त्यावर आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि वरील सर्व मसाले घालून पुन्हा एकदा एकजीव करा. व्यवस्थित मॅरिनेट करा. एका ताटात रवा, हळद, मीठ आणि लाल तिखट घालून मिश्रण तयार करा. वरुन तांदळाचे पीठ घालून छान मिक्स करा. त्यात तयार कारल्याचे काप घोळवून घ्या. 

3. एका पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात रवा लावलेले कारल्याचे काप फ्राय करुन घ्या. दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर गरमागरम वरण-भातासोबत खा. 

टॅग्स :अन्नपाककृती