Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा कुरकुरीत गोभी वडा; मुले आवडीने खातील-सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2026 14:16 IST

Gobi vada recipe: Cauliflower snack recipe: Crispy gobi vada: १० ते १५ मिनिटांत फ्लॉवरचे कुरकुरीत वडे तयार होतील. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

घरात फ्लॉवर आणला की अनेकांच्या नाकावर रागाच्या आठ्या उमटतात, विशेषतः लहान मुलांच्या. तीच ती रस्सा भाजी किंवा सुकी भाजी खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. पण याच फ्लॉवरपासून आपल्याला चटपटीत, कुरकुरीत आणि जिभेची चव वाढवता आली तर...(Gobi vada recipe) छोटी भूक किंवा संध्याकाळी आपल्यापैकी अनेकांना नाश्ता लागतो. अशावेली आपण कुरकुरीत-खमंग फ्लॉवरचे वडे ट्राय करु शकतो. (Cauliflower snack recipe)फ्लॉवरपासून फक्त भाजी किंवा पराठेच बनतात, पण गोभी वडा देखील बनवता येतो. जो चवीला एखाद्या हॉटेलमधील स्टार्टरसारखा लागतो.(Crispy gobi vada) हा पदार्थ केवळ कुरकुरीत नसून तो आतून तितकाच मऊ आणि चविष्ट असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हे वडे बनवण्यासाठी आपल्याला तासंतास किचनमध्ये उभे राहण्याची गरज नाही. १० ते १५ मिनिटांत फ्लॉवरचे कुरकुरीत वडे तयार होतील.  यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

कॉफी पावडर कडक दगड होते- गोळे होतात? 'या' पद्धतीने ठेवा- महिनोंमहिने राहिल फ्रेश- मिळेल कॅफेसारखी कडक कॉफी

साहित्य 

किसलेला फ्लॉवर -२ कप (स्वच्छ धुवून किसलेला)बारीक चिरलेला कांदा-  १ मध्यमबारीक चिरलेली हिरवी मिरची- २ ते ३ आलं-लसूण पेस्ट- १ मोठा चमचाकढीपत्ता- ७-८ पाने बारीक चिरलेली कोथिंबीरओवा- अर्धा चमचाधणे-  १ चमचा, थोडे कुटलेलेजिरे - अर्धा चमचातीळ-  १ चमचा (पांढरे तीळ)लाल तिखट-  १ चमचा गरम मसाला-  अर्धा चमचाबेसन - अर्धा ते पाऊण कप कॉर्न फ्लोअर - २ मोठे चमचेमीठ- चवीनुसारतेल- वडे तळण्यासाठीपाणी- आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्या. नंतर किसून घ्या. किसलेल्या फ्लॉवरमध्ये पाणी असते, त्यामुळे हाताने दाबून अतिरिक्त पाणी काढून टाका. 

2. आता एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेला फ्लॉवर घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, ओवा, धणे, जिरे, तीळ आणि सर्व मसाले घाला. 

3. यामध्ये आता बेसन, कॉर्न फ्लोअर घाला. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित एकजीव करा. हवं असल्यास थोडेसे पाणी घाला. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर वड्यांचा आकार द्या. 

4. हाताला थोडे तेल लावून मिश्रणाचे छोटे गोळे करा आणि त्यांना वड्यांसारखा गोल आकार द्या. कढईत तेल गरम करुन मंद आचेवर वडे तळून घ्या. कुरकुरीत तळल्यानंतर पुदीन्याच्या चटणीसोबत खा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tired of cauliflower? Make crispy Gobi Vada in 10 minutes!

Web Summary : Transform cauliflower into crispy, flavorful Gobi Vada in minutes. This simple recipe uses grated cauliflower, spices, and gram flour. Perfect as a snack, these vada are crispy outside and soft inside. Enjoy with mint chutney!
टॅग्स :अन्नपाककृती