Join us

७ ते ८ दिवस टिकणारे खुसखुशीत दुधीचे थेपले, उन्हाळा स्पेशल हलका-फुलका नाश्ता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2025 09:05 IST

Crispy dudhi thepla recipe: Dudhi thepla for breakfast: Summer special thepla: प्रवासात किंवा लांबच्या ठिकाणी जात असाल तर दुधीचे थेपले नक्की ट्राय करुन पाहा. उन्हाळ्यात खा हलका-फुलका नाश्ता.

मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे सतत त्यांना चटकदार पदार्थ खायला आवडतात.(Crispy dudhi thepla recips) पिझ्झा, बर्गर, मॅगीसारखे पदार्थ त्यांना रोज खावेसे वाटतात. परंतु यात असणारे घटक मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक देखील तितकेच आहे.(Dudhi thepla for breakfast) सकाळच्या नाश्त्यात रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन त्यांना कंटाळा येतो. अशावेळी नेमके काय करायचे पालकांना समजत नाही.(Summer special thepla)  मेथीचे थेपले, बटाट्याचा पराठा, बेसनाचा पोळा आपण खाल्ला असेलच पण आपण कधी दुधीभोपळ्याचे थेपले खाल्ले आहेत का? चवीला अगदी टेस्टी आणि पौष्टिक आहेत.(Best thepla recipe for travel and tiffin) याची भाजी खाताना घरातील अनेकजण नाक मुरडतात. परंतु,याचे थेपले बनवून आपण खाऊ शकतो. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दुधीभोपळा फायदेशीर असतो. प्रवासात किंवा लांबच्या ठिकाणी जात असाल तर दुधीचे थेपले नक्की ट्राय करुन पाहा. उन्हाळ्यात खा हलका-फुलका नाश्ता. (Easy dudhi thepla recipe for summer)

लसूण तडका वांगं, हा चमचमीत पदार्थ खाऊन पाहा! वांगं नको म्हणणारेही खातील आवडीने

साहित्य 

किसलेला दुधीभोपळा - १लसूण पाकळ्या - ७ ते ८ आले - १ इंच हिरव्या मिरच्या - २ ते ३धणे - १ चमचाजिरे - १ चमचाबडीशेप - १ चमचापाणी- आवश्यकतेनुसार गव्हाचे पीठ - १ वाटी ओवा - १ चमचा तीळ - २ चमचे कसुरी मेथी - १ चमचाकोथिंबीर - अर्धी वाटीमीठ - चवीनुसार हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा दही - १ कप 

कृती 

1. सगळ्यात आधी दुधीभोपळ्याचे दोन भाग करा. त्यातील अर्धा भागाची साल काढून त्याच्या आतील बिया काढून घ्या. 

2. आता मिक्सरच्या भांड्यात लसूण, आले, हिरव्या मिरच्या, धणे, जिर, बडीशेप घालून वाटण तयार करा. 

3. त्यानंतर परातीमध्ये गव्हाचे पीठ, ओवा, तीळ, कसुरी मेथी, कोथिंबीर, मीठ, हळद, लाल तिखट, भोपळ्याचा किस, वाटण आणि दही घालून पीठ मळून घ्या. 

4. पीठाचे गोळे तयार करुन चपातीसारखे लाटून घ्या. गॅसवर मंद आचेवर थेपले थापून घ्या. हे थेपले आपण ७ ते ८ दिवस खाऊ शकतो.

 

टॅग्स :अन्नपाककृती