Join us

अण्णाकडे मिळतो तसा कुरकुरीत दालवडा घरीच करण्याची ट्रिक, रेसिपी सोपी आणि वड्याची चव म्हणजे अहाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2025 17:28 IST

crispy dal vada recipe: South Indian breakfast: street style dal vada at home: काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या, तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने दाल वडा बनवू शकता.

दाक्षिणात्य पदार्थांची चव काही वेगळीच आहे. सकाळच्या नाश्त्यात, दुपारच्या जेवणात किंवा रात्री जेवताना हमखास साऊथ इंडियन पदार्थ चवीने चाखले जातात.(South Indian breakfast) सकाळी ऑफिसला जाताना, कॉलेजच्या गप्पांमध्ये किंवा संध्याकाळच्या गप्पा मारताना अनेकदा आपल्याला काही तरी चमचमीत खावसं वाटतं. यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ दाल वडा. (street style dal vada at home)बऱ्याचदा आपण घरी वडा करायचं म्हटलं की तो जास्त तेलकट होतो, घशात अडकतो किंवा अगदीच नरम पडतो. आणि खाल्ल्यानंतर अण्णासारखी चव देखील लागत नाही.(crispy dal vada recipe) म्हणूनच लोक घरच्या घरी वडा करण्यापेक्षा बाहेरच्या हॉटेलकडे धाव घेतात. पण आजच्या काळात प्रत्येकालाच वाटतं की स्वच्छ, झटपट आणि चविष्ट पदार्थ घरच्या घरी मिळाला तर किती बरं होईल.(anna style dal vada) अण्णाकडे वडा खाल्ल्यावर जी क्रिस्पी चव तोंडाला लागते तीच आता घरच्या घरीही आणता येते. काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या, तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने दाल वडा बनवू शकता. पाहूया साहित्य आणि कृती (perfect dal vada tips)

घरच्या घरी करा अण्णाकडे मिळते तशी खोबऱ्याची चटणी, १५ मिनिटांत होणारा खास साऊथ इंडियन पदार्थ

साहित्य 

हरभरा डाळ-  १ कप हिरवी मूग डाळ- १/२ कपआले- १ इंच हिरवी मिरची- ३-४ बडीशेप- १ टीस्पून जिरे- १ टीस्पून मीठ- चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची- २-३ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीरीचे देठं- १ टीस्पून बारीक चिरलेला कढीपत्ता- १ टीस्पून मिरची पावडर- १/२ टीस्पून हळद- १/४ टीस्पून बारीक चिरलेला कांदा- १ मोठा तांदळाचे पीठ- २-३ टेबलस्पून भिजलेली चणा डाळ- २ टेबलस्पून तळण्यासाठी तेल 

Morning Breakfast Idea : कपभर पीठाचे करा बाजरीचे धिरडे, झटपट पौष्टिक नाश्ता, वेटलॉससाठी उत्तम रेसिपी

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्या चण्याची डाळ आणि मूग डाळ वेगवेगळ्या पद्धतीने चांगली धुवून, स्वच्छ करुन ३ ते ४ तास भिजवावी लागेल. आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हिरवी मिरची, आले, जिरे, एका जातीची बडीशेप आणि मीठ, भिजवलेली २ चमचे चणाडाळ, मूग डाळ घेऊन जाडसर वाटून घ्या. यात पाणी घालायचे नाही. तयार मिक्सरमधील साहित्य काढून घ्या. 

2. मिक्सरच्या भांड्यात उरलेली चणाडाळ आणि मूग डाळ वेगवेगळी पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. आता दोन्ही वाटलेल्या डाळी आणि मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण बाऊलमध्ये एकजीव करा. त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीरीची देठं घाला. आता यात मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घाला. वरुन चिरलेला कांदा आणि तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य एकजीव करा. मिश्रणाचे गोल आकारात वडे तयार करा. 

3. तळण्यासाठी कढईत तेल गरम करा, तेल मध्यम गरम झाले की, वडाच्या मिश्रणाचा छोटासा भाग घ्या, त्यातून गोळा तयार करा आणि तयार गोळा चपटा करून वडाचा आकार घ्या. नंतर मंद आचेवर मध्यम गरम तेलात वडे छान सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत तळून घ्या. हिरवी चटणी किंवा तळलेल्या मिरच्यांसोबत खा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Crispy Dal Vada Recipe: Anna Style Vada at Home!

Web Summary : Make crispy Anna-style Dal Vada at home! This easy recipe avoids oiliness and delivers authentic South Indian taste. Follow simple tricks for perfect results.
टॅग्स :अन्नपाककृती