थंडीचे दिवस सुरु झाले की आपल्याला गरमागरम पदार्थ खावेसे वाटतात.(crispy cauliflower pakora) गरमागरम चहा, कुरकुरीत पकोडे आणि वातावरणातील गारवा याचे कॉम्बिनेशन वेगळेच आहे.(gobi pakora recipe) या दिवसात घरात काहीतरी झटपट आणि स्वादिष्ट खायची इच्छा होते.(cauliflower fritters) आपल्या घरात अशा अनेक भाज्या येतात, ज्यांचा वापर आपण फार करत नाही.(winter snacks recipe) अगदी कधीतरी करतो, त्यातील एक फ्लॉवर.(Indian tea time snacks) याचा वापर आपण भाजी किंवा मसाले भातात करतो. अनेकांना ही भाजी आवडत नाही. पण या फुलगोबीची भजी मस्त कुरकुरीत तसेच चविष्ट होते. फ्लॉवरचे पकोडे कसे करायचे पाहूया.
मेदूवडा तळताना फुटतो- वातड-कडक होतो? ५ टिप्स, घरच्याघरी होईल अण्णाकडे मिळतो तसा परफेक्ट वडा
साहित्य
फ्लॉवर - १ मोठी
मैदा -१ वाटी
कॉर्नफ्लॉर - १ छोटी वाटी
मीठ - चवीनुसार
लाल मिरची पावडर - १ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
काळी मिरी पावडर - १ चमचा
ऑरिगॅनो - १ चमचा
पेरी पेरी मसाला - १ छोटा चमचा
ब्रेड क्रम्स - १ वाटी
पाणी - आवश्यकतेनुसार
तेल - तळण्यासाठी
तीळ - १ चमचा
वांगी किडलेली आहेत की चांगली कसं ओळखाल? भाजी खरेदी करताना लक्षात ठेवा ४ टिप्स
कृती
1. सगळ्यात आधी फ्लॉवर स्वच्छ करुन घ्या. त्याची पाने काढून घ्या आणि तुकडे करा. आता एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, कॉर्नफ्लॉर, मीठ, लाल मिरची पावडर आणि बाकी सर्व मसाले घाला. त्यात पाणी घालून बॅटर तयार करा.
2. आता फ्लॉवरचे तुकडे तयार बॅटरमध्ये डीप करा. त्यानंतर ब्रेड क्रम्स आणि तीळ एकत्र करा. डीप केलेल फ्लॉवर घालून फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवा.
3. यानंतर तेल गरम करुन मंद आचेवर तळून घ्या. वरुन कोथिंबीर आणि मियोनीज घालून गरमागरम चहासोबत खा फ्लॉवरचे पकोडे.
