आपल्यापैकी अनेकांना कारलं फारसं आवडत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ही भाजी चांगली जरी असली तरी त्याच नाव ऐकताच अनेकजण नाक मुरडतात. (crispy bitter gourd fry) आजच्या फास्टफूड आणि तेलकट आहारात कारल्यासारखी कडू भाजी आपल्या आहारात असणं जास्त गरजेचे आहे. (karela fry recipe) आतापर्यंत आपण कारल्याची भाजी, भरलेले कारले किंवा कारल्याचे काप खाल्ले असतील. (bitter gourd fry benefits) पण आता कारल्याचे कुरकुरीत मसालेादर फ्राय कारली खाऊन पाहा. (spicy karela recipe) कारले फ्राय म्हणजे कमी वेळात होणारी आणि पौष्टिकतेने भरलेली एक उत्तम डिश आहे. जी आपल्या जेवणात, डब्यात किंवा साईड डिश म्हणून देखील खाऊ शकतो. (tasty bitter gourd recipe) लहान मुलं किंवा कारलं न आवडणारे मोठेसुद्धा त्याच्या कुरकुरीतपणामुळे ही भाजी आवडीने खातात. कुरकुरीत मसालेदार फ्राय कारली कशी बनवायची पाहूया. (how to remove bitterness from karela)
डब्यासाठी करा खास चविष्ट चणाडाळ कोबी, रेसिपी झटपट - चवही मस्त, कोबी न खाणारेही आवडीने खातील
साहित्य
कारले - ३ ते ४
मीठ - चवीनुसार
लाल तिखट - २ चमचा
जिरे पावडर - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
हळद - १ चमचा
लिंबाचा रस
रवा - आवश्यकतेनुसार
तांदळाचे पीठ - आवश्यकतेनुसार
तेल - २ चमचे
Flax Seeds Chutney Recipe : रोज जेवणात चमचाभर 'ही' चटणी खा, वजन- बीपी राहिल कंट्रोल- पाहा रेसिपी
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला कारले धुवून त्याच्या वरचे साल काढावे लागेल. त्यानंतर त्याच्या आतील बिया काढून घ्या. आता एका उभ्या रेषेत कारले कापून घ्या. एका कारल्याचे किमान १० ते १२ काप व्हायला हवे. नंतर त्यात मीठ घालून व्यवस्थित चोळून घ्या. १० ते १५ मिनिटानंतर कारले हाताने दाबा ज्यामुळे त्यातील कडूपणा निघून जाईल.
2. आता एका भांड्यात कारले घेऊन त्यात लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, हळद आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित एकजीव करा. त्यानंतर एका ताटात रवा, तांदळाचे पीठ आणि लाल तिखट घालून सर्व साहित्य एकत्र करा.
3. तवा चांगला गरम करुन त्यावर तेल घाला. रव्याच्या मिश्रणात कारल्याचे मिश्रण घालून एकजीव करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात कारले फ्राय करुन घ्या.तयार होईल कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय.