Lokmat Sakhi >Food > ४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ

४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ

Crispy moong dal masala puri recipe: Moong dal paratha for tiffin: खमंग खुसखुशीत होणारी मुगडाळीची पुरी कशी करायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2025 12:09 IST2025-06-08T12:08:17+5:302025-06-08T12:09:17+5:30

Crispy moong dal masala puri recipe: Moong dal paratha for tiffin: खमंग खुसखुशीत होणारी मुगडाळीची पुरी कशी करायची पाहूया.

how to make crispy and tasty moong dal masala puri paratha at home store in 3 to 4 days morning tiffin or breakfast idea | ४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ

४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ

अनेकांच्या घरात सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं याची लिस्ट केली जाते.(Indian breakfast) पण रोज पोहे- उपमा सारखे पदार्थ रोज खाऊन कंटाळा येतो.(Moong dal paratha) दिवसाची सुरुवात इतक्या घाईत होते की, नेमक काय बनवावे सुचत नाही. सकाळचा नाश्ता हा प्रोटीने भरलेला असला की, आपल्या दिवसाची सुरुवात ऊर्जात्मक होते. अनेकदा आपल्याकडून सकाळचा नाश्ता स्कीप केला जातो. (Protein-rich Indian breakfast)
लवकरच मुलांच्या सुट्ट्या संपून शाळा सुरु होतील. अशावेळी मुगाच्या डाळीपासून बनवलेला पदार्थ आपण त्यांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो.(Healthy puri for kids tiffin) पिवळी मुगाची डाळ आरोग्यासाठी चांगली असते. यामध्ये प्रथिने, लोह, फायबरसारखे पोषक तत्व असतात जे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारतात तसेच पचनक्रिया देखील सुरळीत करतात.(Masala moong dal paratha) खमंग खुसखुशीत होणारी मुगडाळीची पुरी कशी करायची पाहूया. काही मिनिटांत तयार होणारा चविष्ट पदार्थ नक्की करुन पाहा.

School Tiffin Box Recipe : शाळेच्या डब्यात काय देऊ? व्हेज रॅप पोहा टिक्की, नाव अवघड असलं तरी पदार्थ सोपा आणि झटपट

साहित्य 
मुगाची डाळ - १ वाटी 
बारीक चिरलेली कोथिंबीर 
धने - १ चमचा 
तीळ - १ चमचा 
हिंग - १ चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
लाल तिखट - १ चमचा 
जिरे - १ चमचा 
हळद - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
तेल 
कणकेचा गोळा 



साहित्य 

1. सगळ्यात आधी पिठाचे कणीक मळून बाजूला ठेवा. आता पॅनवर मुगाची डाळ खरपूस भाजून घ्या. 

2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या मुगडाळीचा पावडर तयाप करा. 

3. एका बाऊलमध्ये भाजलेली मुगडाळ आणि वरील सर्व साहित्य एकत्र करा. वरुन तेल घालून त्याचे सारण तयार करा. 

4. आता कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये सारण भरा. चपाती किंवा पुरीसारखे लाटून घ्या. 

5. पॅन गरम करुन त्यावर तयार चपाती लाटून घ्या, खरपूस भाजल्यानंतर वरुन तूप लावा. 

6. तयार होईल खुसखुशीत मुगडाळीची पुरी. 

 

 

Web Title: how to make crispy and tasty moong dal masala puri paratha at home store in 3 to 4 days morning tiffin or breakfast idea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.