Join us

तब्बल १० दिवस टिकणारे खुसखुशीत आंब्याचे घारगे करा, चहासोबतचा स्पेशल खाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 09:05 IST

Mango puri recipe: Ambyaache Gharge recipe: Mango pulp puri: मुलांसाठी आवडीने तयार करा. खुसखुशीत आंब्याचे घारगे, पाहूया सोपी रेसिपी

उन्हाळ्यात आपल्याला आंबे किती खाऊ आणि किती नको असं होते.(Mango puri recipe) अगदी आंब्यापासून कोणते पदार्थ बनवता येतील याची लिस्ट देखील आपल्याकडे असते.(Ambyaache Gharge recipe) रोज आंब्याचे आपण नवनवीन पदार्थ बनवून त्याची चव चाखतो. अगदी आमरस, पोळी, पेढा, लाडू, बर्फी, आंबापोळी, मोदक असे विविध पदार्थ आपण बनवतो. नुसताच आमरस खाऊ वैतागले असाल तर आंब्याचे घारगे ट्राय करा. (Mango pulp puri)आंब्याचे घारगे ट्राय करण्यासाठी बेसन किंवा मोहनची गरज लागणार नाही.(Mango sweet puri) अगदी काही वेळात तयार होतील. इतकेच नाही तर १० दिवस टिकणारा पौष्टिक आणि हेल्दी खाऊ तयार होईल. उन्हाळ्याची सुट्टी आहे, मुलांसाठी आवडीने तयार करा. खुसखुशीत आंब्याचे घारगे पाहूया सोपी रेसिपी. (Maharashtrian snack recipe)

भाज्यांचा पौष्टिक पराठा, १५ मिनिटांत होईल सकाळचा कुरकुरीत हेल्दी नाश्ता, भाज्या नको म्हणणारेही खातील आवडीने...

साहित्य 

आंब्याचा पल्प - १ वाटी गूळ - १ कप गव्हाचे पीठ - २ कप मीठ - चवीनुसार पाणी तेल 

कृती 

1. सगळ्यात आधी आंब्याचे साल काढून चाळीवर तो घासून त्याचा गर काढून घ्या. 

2. आता कढईमध्ये तयार आंब्याचा पल्प आणि गूळ घालून चांगले शिजवून घ्या. शिजवलेले मिश्रण पुन्हा चाळणीने गाळून घ्या. 

3. मोठ्या परतीमध्ये गव्हाचे पीठ, मीठ आणि तयार आंब्याचे मिश्रण घालून पीठ मळून घ्या. पाण्याची गरज भासली तर पाणी घाला. 

4. आता त्याचे छोटे गोळे तयार करुन पुरीसारखे लाटून घ्या. कढईत तेल तापवून पुरी तळून घ्या. पुरी लाटताना जाडसर असायला हवी, तरच ती फुगेल.

5. तयार घारगे हवा बंद डब्यात भरून ठेवा. चहासोबत किंवा हवं तेव्हा खा, आंब्याचे पौष्टिक खुसखुशीत घारगे. 

 

टॅग्स :अन्नपाककृती