Join us

काळ्या चण्याचा कुरकुरीत मसाला डोसा, आंबवणे-भिजवण्याची गरज नाही, काही मिनिटांत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2025 12:13 IST

instant dosa recipe: no fermentation dosa: black chana masala dosa: पाहूया काळ्या चण्याचा मसाला डोसा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी

सुट्टीचा दिवस म्हटला की आपल्या घरात हमखास बनवले जातात ते इडली आणि डोसा. साऊथ इंडियन पदार्थांमधील अनेक पदार्थांची चव सकाळच्या नाश्त्यात चाखली जाते.(instant dosa recipe) मेदू वडा, सांबर, उत्तपा, इडली-चटणीसारखे अनेक पदार्थ आहे. खरेतर पावसाळ्यात डोसा बनवायचा असेल तर त्याचे पीठ व्यवस्थित बनत नाही.(no fermentation dosa) त्यामुळे डोसे काही एकदम परफेक्ट होत नाहीत. डोसा बनवण्यासाठी आपल्याला डाळ आणि तांदळाचे पीठ भिजवावे लागते. त्यानंतर ते आंबवून त्याचे बॅटर तयार होते.(black chana masala dosa) कामाच्या गडबडीत आपल्याकडे इतका वेळ नसतो त्यामुळे आपण अशावेळी आपण बॅटर विकत आणतो.(healthy Indian breakfast recipes) पण अनेकदा त्याची चव देखील आपल्याला वेगळी लागते. पण आज काही हटके आणि नवीन ट्राय करायचे असेल तर काळ्या चण्याचे डोसे करुन पाहा.(high protein dosa recipe) पचायला हलके, पौष्टिक आणि चवीला देखील एकदम टेस्टी लागतील. पाहूया काळ्या चण्याचा मसाला डोसा कसा बनवायचा याची सोपी रेसिपी. 

हाय हाय मिरची! तोंडाला येईल चव करा झणझणीत मसाला सिमला मिरची, पावसाळ्यात खास पदार्थ

साहित्य भिजवलेले काळे चणे - १ वाटी कोथिंबीर - अर्धा कप रवा - अर्धा कप हिरवी मिरची - २ जिरे - अर्धा चमचा मीठ - चवीनुसार दही - अर्धी वाटीपाणी तेल बारीक चिरलेला कांदा - १ वाटी लाल मिरच्या लसूणची चटणी - २ चमचे पनीर चाट मसाला 

साहित्य 

1. सगळ्यात आधी काळे चणे ७ ते ८ तास भिजवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काळे चणे, कोथिंबीर, जिरे, पाणी, दही, रवा आणि मीठ घालून वाटून घ्या.  

2. डोशाच्या तव्यावर पाणी शिंपडून बॅटर पसरवून घ्या. बाजूने तेल पसरवा. त्यावर लाल चटणी लावा. 

3. बारीक चिरलेला कांदा, किसलेले पनीर, कोथिंबीर आणि चाट मसाला घाला. 

4. व्यवस्थित शिजल्यानंतर फोल्ड करुन सर्व्ह करा काळ्या चण्याचा पौष्टिक डोसा.

 

टॅग्स :अन्नपाककृती