मुलांना भाज्या खायला लावणं हे प्रत्येक आईसाठी नवीन युद्धच असतं.(pumpkin pasta recipe) भाजी म्हटलं की, ते सरळ नाक मुरडतात.(healthy pasta for kids) भाजी कितीही छान किंवा चविष्ट बनवली तरी देखील मुलं खात नाही. पण हेच चायनिज किंवा फास्ट फूड, इटालियन पदार्थ मुलं आवडीने खातात.पास्ता असो किंवा पिझ्झा.(homemade pumpkin pasta) अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण चवीने खातात. पण पास्ता हा मैद्यापासून बनवलेला पदार्थ.(easy pasta recipes for lunch) मुलांना खाऊ घालताना अनेक पालकांना टेन्शन येतं. आपल्या मुलांनी हेल्दी पदार्थ खावे असं प्रत्येकाला वाटतं.(kids lunch ideas) व्हाइट सॉसमध्ये देखील मैद्याचा वापर केला जातो. जो आपल्या शरीरासाठी हानिकारक असतो.(pumpkin recipes for children)
हेल्दी पण टेस्टी हवं असेल तर आपण भोपळ्याचा पास्ता ट्राय करु शकतो.(creamy pumpkin pasta) यामध्ये वापरला जाणारा पास्ता हा मल्टीग्रीन पीठापासून बनवला आहे.(Indian-style pasta recipe) ज्यामुळे मुलांसाठी तो अतिशय हेल्दी आणि टेस्टी बनवू शकतो. घरच्या घरी भोपळ्याचा पास्ता कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
साहित्य
भोपळ्याचे काप - १ वाटी
शिमला मिरची - १
गाजर - १
मक्याचे दाणे - १ वाटी
आले - १ छोटी वाटी
मखाने - १ छोटी वाटी
पनीर - २ मोठे क्यूब
बटर - २ चमचा
कांदा - १ छोटी वाटी
बारीक चिरलेला लसूण - १ छोटी वाटी
ब्रोकोली - १ वाटी
उकडलेला पास्ता - १ वाटी
मीठ - चवीनुसार
जिरे - १ चमचा
ऑरगॅनो - १ चमचा
चिली फ्लेक्स- १ चमचा
करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात? ७ टिप्स - होतील खुसखुशीत, एकही करंजी फुटणारी नाही
कृती
1. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात बटर घाला. त्यानंतर भोपळ्याचे काप, शिमला मिरचीचे तुकडे, गाजरचे तुकडे, मक्याचे दाणे, आले, मखाने आणि कांदा व्यवस्थित परतवून घ्या. झाकण झाकून १५ ते २० मिनिटे शिजू द्या. नंतर चमच्याने भोपळा शिजला आहे की, नाही पाहा.
2. आता पॅनमधील मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात पनीर घालून त्याची पेस्ट तयार करा. आता पुन्हा पॅन गरम करुन त्यात बटर, लसूण, कांदा, ब्रोकोली, मक्याचे दाणे चांगले परतवून घ्या. वरुन ऑरगॅनो, चिली फ्लेक्स आणि जिरे घालून परतवून घ्या.
3. यामध्ये आता तयार भोपळ्याचा सॉस घाला. व्यवस्थित परतवून त्यात उकडलेला पास्ता आणि मीठ घालून एकजीव करा. झाकण ठेवून वाफ काढा. तयार होईल सुपरहेल्दी भोपळ्याचा पास्ता.