कोथिंबीर म्हटलं की आपल्याला भाजीवर पेरायची हिरवीगार पानं आठवतात. कधी कधी कोथिंबीरीची भाजी किंवा कोथिंबीरीची वडी केली जाते.(coriander dhapate recipe) पण बहुतेक वेळा स्वयंपाकघरात केवळ सजावटीपुरता मर्यादित राहते. पण आईच्या हाताची चव पदार्थ असे असतात जे त्याचा सुगंध आणि स्वादासाठी ओळखले जातात. त्यापैकीच एक कोथिंबीरीचे धपाटे.(kothimbir dhapate) या आधी आपण विविध पीठांपासून तयार केलेले धपाटे खाल्लेच असतील. पण साध्या साहित्यातून, झटपट होणारा आणि खुसखुशीत चवीचा खास पदार्थ. सध्याच्या धावपळीत आपल्याला नवीन काही ट्राय करायला वेळ नसतो.(quick dhapate recipe) अशावेळी ५ मिनिटांत तयार होणारा, पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ हवा असेल तर कोथिंबीरीचे धपाटे नक्की ट्राय करु शकता. रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर हा पर्याय नक्कीच वेगळा आणि स्वादिष्ट ठरतो.
साहित्य
बारीक चिरलेला कोथिंबीर - १ जुडी बाजरी पीठ - १ वाटी गव्हाचे पीठ - १ वाटी बेसन - १ छोटी वाटी जीरे - १ चमचा तीळ - १ चमचा ओवा - १ चमचा मीठ - चवीनुसार धने पावडर - १ चमचा लाल तिखट - अर्धा चमचा हिरवी मिरची, आलं-लसूण, जिरे आणि शेंगदाण्याचा ठेचा - २ मोठे चमचे तेल किंवा तूप - आवश्यकतेनुसार पाणी - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात ३ ते ४ हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, जिरे आणि शेंगदाणे घालून त्याचा ठेचा तयार करा.
2. आता कोथिंबीर धुवून घ्या. त्यात गव्हाचे, बाजरीचे आणि बेसनाचे पीठ घाला. वरुन तीळ, ओवा, मीठ, धने पावडर, लाल तिखट आणि हिरव्या मिरचीच पेस्ट घाला. सर्व साहित्य एकत्र करुन त्यात पाणी घालून पीठाचा गोळा तयार करा.
3. आता सुती कापड ओला करुन घ्या. गोळा घेऊन हाताने धपाटे थापा. मध्ये खड्डे करुन घ्या. तव्यावर तेल पसरवून धपाटे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. ठेचासोबत खा गरमागरम कोथिंबीरीचे धपाटे.
Web Summary : This quick coriander Dhapate recipe uses simple ingredients for a delicious and filling meal. Ready in minutes, it's a tasty alternative to everyday food. Key ingredients include coriander, millet and wheat flour, spices, and a ginger-garlic-peanut paste.
Web Summary : यह झटपट धनिया ढपटे रेसिपी स्वादिष्ट और पेट भरने वाले भोजन के लिए सरल सामग्री का उपयोग करती है। मिनटों में तैयार, यह रोजमर्रा के भोजन का एक स्वादिष्ट विकल्प है। मुख्य सामग्री में धनिया, बाजरा और गेहूं का आटा, मसाले और अदरक-लहसुन-मूंगफली का पेस्ट शामिल हैं।