जेवणाच्या ताटात डाव्या बाजूला वाढला जाणारा पदार्थ हा लोणचं, कोशिंबीर किंवा चटणीचा असतो.(Coriander chutney recipe) त्यातीलच एक चटणी. साध्या वरण-भातासोबत चटणी खाल्ली तर त्या पदार्थाची चव अप्रतिम लागते.(Green chutney for sandwich) अनेकदा आपण स्ट्रीट फूड किंवा हॉटेलमध्ये हिरवी चटणी वडापाव , फाफडा किंवा सॅण्डविचसोबत खातो.(Dosa chutney recipe) चटणी पदार्थाची चव आणखी वाढवते. ही हिरवी चटणी आपण कोथिंबीरीपासून बनवतो.(Indian chutney recipes) पण अनेकदा अशी चटणी काही दिवसांत काळी पडते. चव बदलते किंवा आंबट वास येऊ लागतो.(Homemade coriander chutney)कोथिंबीर केवळ पदार्थांची चव वाढवत नाही तर यात भरपूर पोषक घटक आहेत.(Easy green chutney recipe) यात व्हिटॅमिन सी, के आणि अँटिऑक्सिडंट्स आहेत जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.(Coriander mint chutney) ही चटणी फक्त वडापाव, भजी, पराठा, पोहे यांसोबतच नाही तर दैनंदिन जेवणातल्या भात-भाजीसोबतही अप्रतिम लागते. ही हिरवीगार चटणी घरच्याघरी सोप्या पद्धतीने कशी करायची पाहूया.
साहित्य
मोहरी - २ चमचा मेथी दाणे - १ चमचा तेल - आवश्यकतेनुसार कोथिंबीरीची पाने - २ कप चिंचेची चटणी - २ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचा मीठ - चवीनुसार पाणी - आवश्यकतेनुसार जिरे - १ चमचा लसूण - १० ते १२ पाकळ्या लाल मिरची - ४ ते ५कढीपत्ता - १० ते १२ पानं
पाहुण्यांसाठी खास बेत! हॉटेलसारखे चमचमीत दही छोले करा घरच्याघरी, रेसिपी अशी की तोंडाला सुटेल पाणी
कृती
1. सगळ्यात आधी पॅनवर मोहरी आणि मेथी दाणे भाजून घ्या आणि त्याची पावडर वाटून घ्या. आता पॅनवर तेल गरम करुन कोथिंबीर चांगली परतवून घ्या.
2. आता मिक्सरमध्ये परतवून घेतलेली कोथिंबीर थंड झाल्यानंतर त्यात चिंचेची चटणी, भाजलेली मोहरी-मेथी पूड, काश्मिरी लाल मिरची पावडर, मीठ आणि पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा.
3. पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे- मोहरी घालून तडतडू द्या. आता त्यात लसणाच्या पाकळ्या, लाल मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून चांगले परतवून घ्या. त्यात तयार कोथिंबीरीची पेस्ट घालून व्यवस्थित परतवून घ्या. वाफाळत्या भातासोबत आवडीने खा. हिरव्यागार कोथिंबीरची चटणी.
Web Summary : Coriander chutney elevates simple meals. This recipe creates a vibrant, flavorful condiment using coriander leaves, spices, and a unique tempering process. It's perfect with vada pav, sandwiches, or rice and vegetables, offering a delicious and nutritious boost to any dish.
Web Summary : धनिया चटनी सरल भोजन को बढ़ाती है। यह रेसिपी धनिया पत्ती, मसालों और एक अनूठी तड़का प्रक्रिया का उपयोग करके एक जीवंत, स्वादिष्ट मसाला बनाती है। यह वड़ा पाव, सैंडविच या चावल और सब्जियों के साथ एकदम सही है, जो किसी भी व्यंजन को स्वादिष्ट और पौष्टिक बढ़ावा देता है।