Join us

घरच्या घरी करा अण्णाकडे मिळते तशी खोबऱ्याची चटणी, १५ मिनिटांत होणारा खास साऊथ इंडियन पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2025 16:07 IST

coconut chutney recipe: south Indian chutney at home: hotel-style coconut chutney : ओल्या नारळापासूनची ही चटणी घरच्या घरी बनवायची असेल तर कशी बनवायची पाहूया.

बहुतेक घरात सकाळच्या नाश्त्यात इडली-डोसा, वडा किंवा उपमा खाल्ला जातो. पण याची चव अधिक रंगतदार होते ती खास चटणीमुळे.(coconut chutney recipe) यासोबत मिळणारी खास खोबऱ्याची चटणी अगदी टेस्टी लागते. अनेकदा आपण ही चटणी घरी बनवण्याचे ट्राय करतो पण काही केल्या चव काही तशी येत नाही.(south Indian chutney at home) बघायला गेलं तर योग्य साहित्य आणि अचूक प्रमाणात आपल्याला अगदी हॉटेलसारखी ही चटणी बनवता येईल. (hotel-style coconut chutney)दक्षिण भारतात नारळाच्या चटणीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. नारळाच्या चटणीसोबत इडली, वडा, डोसा किंवा उत्तपा आवडीने खाल्ला जातो.(easy coconut chutney) ओल्या नारळापासून बनवलेली ही चटणी आरोग्यासाठी फायदेशीर देखील मानली जाते. ही चटणी घरच्या घरी बनवायची असेल तर कशी बनवायची पाहूया. (step by step coconut chutney at home)

Morning Breakfast Idea : कपभर पीठाचे करा बाजरीचे धिरडे, झटपट पौष्टिक नाश्ता, वेटलॉससाठी उत्तम रेसिपी

साहित्य 

किसलेला नारळ - १ कप हिरव्या मिरच्या -२आल्याचा तुकडा - १ इंच भाजलेली हरभरा डाळ - २ चमचे दही - २ चमचे मीठ - चवीनुसार पाणी तेल - १ चमचा कढीपत्ता - ७ ते ८मोहरी - अर्धा चमचा लाल मिरच्या - २ सुक्या 

कृती 

1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात किसलेला नारळ घ्या. त्यात हिरव्या मिरच्या, आले आणि भाजलेली हरभरा डाळ घाला. त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून बारीक पेस्ट वाटून घ्या. आपल्याला अधिक क्रीमयुक्त चटणी हवी असेल तर त्यात दही घाला. नंतर ही पेस्ट एका भांड्यात काढा. 

2. आता फोडणीसाठी एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घाला. हलके भाजल्यानंतर फोडणी चटणीमध्ये घालून चांगले मिसळा. काही वेळातच अण्णाकडे मिळते तशी साऊथ इंडियन स्टाइलची नारळाची चटणी तयार होईल.  

टॅग्स :अन्नपाककृती