बऱ्याचशा भारतीय पदार्थांमध्ये आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करतो. भाजी, आमटी यांसारख्या पदार्थांमध्ये तर खोबरं हवंच. खोबऱ्याशिवाय काही पदार्थ हे अधुरेच आहेत. नारळ फोडल्यावर काहीवेळा ओलं खोबर शिल्लक राहते आणि ते लवकर खराब (homemade coconut cake) होण्याची शक्यता असते. अशावेळी या खोबऱ्याचा वापर करून आपण (How To Make Coconut Cake At Home) स्वादिष्ट आणि पौष्टिक असा केक तयार करू शकता. शिल्लक (coconut cake recipe) राहिलेल्या ओल्या खोबऱ्याचा वापर करून बनवलेला केक हा चवीला अप्रतिम लागतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.
खोबऱ्याची गोडसर चव, त्यात मिसळलेला सुगंध आणि मऊ - लुसलुशीत अशा या केकची चव दीर्घकाळ खाणाऱ्याच्या जिभेवर रेंगाळत राहते. खास करून सण-समारंभ, पार्टी किंवा खास पाहुण्यांसाठी हा केक घरच्या घरी करणे अगदी सोपं आणि झटपट शक्य आहे. घरी सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी केवळ स्वादिष्टच नाही तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं ट्रीट देण्यासाठी देखील उत्तम पदार्थ आहे. ओल्या खोबऱ्याचा मऊसर आणि लज्जतदार केक कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पिठीसाखर - १/२ कप
२. तेल - १/२ कप
३. दही - १/२ कप
४. मैदा / गव्हाचे पीठ - १ कप
५. बेकिंग पावडर - १/२ टेबलस्पून
६. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
७. दूध - १ कप
८. व्हॅनिला / कोकोनट इसेंन्स - १ ते २ थेंब
९. ओलं खोबरं - १/२ कप (किसलेलं ओलं खोबरं)
१०. ड्रायफ्रुटस काप - २ ते ४ टेबलस्पून
११. नारळाचे काप - २ ते ३ टेबलस्पून
गरम चपाती डब्यांत ठेवताच ओली होते ? ५ ट्रिक्स - चपाती ओली न होता राहील मऊ लुसलुशीत...
शेवग्याच्या पानांची चटणी म्हणजे सुपरफूड! रोज खा-हाडं होतील मजबूत -स्वस्तात मस्त औषध...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये पिठीसाखर, तेल, दही असे तिन्ही पदार्थ एकत्रित घेऊन ते चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे.
२. या तयार मिश्रणात आपण मैदा किंवा गव्हाचे पीठ या दोघांपैकी कोणतेही एक पीठ घालून मिश्रण कालवून घ्यावे.
३. त्यानंतर या तयार बॅटरमध्ये, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, कोकोनट किंवा व्हॅनिला इसेंन्स घालावे.
४. आता या मिश्रणात किसलेलं ओलं खोबरं घालावं.
५. तयार केकचे बॅटर एका केक टिनमध्ये ओतावे, मग या बॅटरवर किसलेलं ओलं खोबरं, ड्रायफ्रुटसचे काप आणि नारळाचे काप लावून सजावट करुन घ्यावी.
६. आता एका मोठ्या पसरट कढईत छोटे स्टॅन्ड ठेवून त्यावर हा केक टिन ठेवून द्यावा, वरुन झाकण लावून ३० ते ४० मिनिटे मध्यम आचेवर केक व्यवस्थित बेक करून घ्यावा.
मस्त असा घरगुती ओल्या खोबऱ्याचा केक खाण्यासाठी तयार आहे.