Join us

तूप-साखर न वापरता करा फुटण्याची चिक्की! कंबर-पाठीचं दुखणं पळून जाईल, वयात येणाऱ्या मुलांसाठी पौष्टिक खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 15:56 IST

Chikki without sugar and ghee recipe: Healthy chikki recipe for back pain relief: Bone-strengthening chikki with sesame and fennel: Chikki for bone health without dry fruits: Chikki with roasted chana and fennel for pain relief: Back pain relief foods: Chikki with sesame seeds: Sugar-free chikki recipe for healthy bones: Homemade chikki for bone and joint health: chiiki recipe: ज्या महिलांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी ही चिक्की नियमितपणे खा.

उन्हाळा सुरु झाला असून या काळात आपल्याला पौष्टिक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. वातावरणातील बदलामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. अशा वेळी आहारात काही पौष्टिक आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करायला हवा. (Chikki without sugar and ghee recipe)उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्यालासोबत ग्लुकोज वाढवणारे पदार्थ सोबत ठेवायला हवे. या काळात थकवा, डिहायड्रेशन, घाम, डोकेदुखी अशा समस्या निर्माण होतात. अनेकदा अचानक बीपी कमी होतो. (Healthy chikki recipe for back pain relief) अशावेळी गोडाचा पदार्थ खाऊन आपण या समस्येवर मात करु शकतो.

मुलांना हल्ली बाहेरचे जंकफूड खाण्याची सवय लागली आहे. त्यांच्या ताटात काही पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ वाढले की, नाक मुरडण्याचे काम सुरु असते. (Chikki with roasted chana and fennel for pain relief)  मुलांना शेंगदाणे, गूळ , तीळ किंवा चणे नुसते खायला आवडत नाही. वाढत्या वयात मुलांची हाडे देखील बळकट करायची असतात. या ४ ही पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि लोह आढळते. मुलांचे आरोग्य निरोगी राखायचे असेल किंवा हाडं मजूबत ठेवायची असतील. (Homemade chikki for bone and joint health) कामाच्या ठिकाणी आपल्याला सतत काही खाण्याची इच्छा होते तेव्हा ही चिक्की खा. शरीरासाठी एकदम उत्तम आहे. ज्या महिलांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी ही चिक्की नियमितपणे खा. (chiiki recipe)

कपभर हिरव्या मुगाच्या डाळीचा करा मऊ-लुसलुशीत, जाळीदार ढोकळा, पचायला एकदम हलका, सोपी रेसिपी

साहित्य 

फुटाणे - १ वाटी बडीशेप - १ छोटी वाटी तीळ - १ छोटी वाटीचिरलेला गूळ - १ वाटी पाणी - आवश्यकतेनुसार 

कृती  

1. सर्वात आधी कढई तापत ठेवून त्यात चिरलेला गूळ घाला. त्यात थोडे पाणी घालून त्याला चांगला वितळवून घ्या.   

2. मंद आचेवर गूळ वितळल्यानंतर त्याचे पाक तयार झाले की, नाही हे तपासा. 

3. यामध्ये फुटाणे, बडीशेप, तीळ घालून चांगले मिक्स करा. 

4. बेकिंग पेपरवर तयार सारण परसवून लाटून घ्या. हलक गरम असताना सुरीने त्याच्या वड्या पाडा. 

5. चिक्की थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यात भरून ठेवा.  

6. ही चिक्की रोज खाल्ल्याने हाडे मजबूत होतील. तसेच कंबर, पाठीचा त्रास कमी होईल. 

 

टॅग्स :अन्नपाककृती