Join us  

कपभर तांदुळाची करा हेल्दी-पारंपारिक खीर, चवीला जबरदस्त-बनवायला सोपी; पाहा कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2024 12:29 PM

How To Make Chawal Ki Kheer At Home : महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी करा तांदुळाची पारंपारिक खीर..

आज महाशिवरात्री (Mahashivratri). आजच्या दिवशी भक्तगण भगवान शंकर आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा करतात. या दिवशी काही लोकं उपवास धरतात. उपवासाच्यानिमित्ताने काही लोकं उपाशी राहतात, तर काही लोकं उपवासाचे पदार्थ खातात. शिवाय दुसऱ्या दिवशी गोड पदार्थ खाऊन उपवास सोडतात (Cooking Tips). तर काही भाजी-पोळी खाऊन उपवास सोडतात. जर आपल्याला उपवास गोड पदार्थ खाऊन सोडायचं असेल तर, तांदुळाची हेल्दी गोडसर खीर तयार करून उपवास सोडा. घरगुती साहित्यात अगदी कमी वेळात ही चविष्ट खीर तयार होते (Rice Kheer).

शिवाय एक वाटी तांदुळाची खीर खाल्ल्याने पोट गच्च भरते. जर आपल्याला देखील गोड पदार्थ खाऊन उपवास सोडायचं असेल तर, यापद्धतीने तांदुळाची खीर एकदा करून पाहाच. या पद्धतीची खीर आपण कधीच खाल्ली नसेल(How To Make Chawal Ki Kheer At Home).

तांदुळाची खीर करण्यासाठी लागणारं साहित्य

तांदूळ

पाणी

दूध

इडली-डोश्याचं पीठ आंबवण्याचे नवे टेक्निक; जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली तयार करण्यासाठी..

केसर

साखर

वेलची पूड

ड्रायफ्रुट्स

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात एक लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर गॅस ठेवा. एका बाऊलमध्ये एक कप तांदूळ आणि त्यात पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यात एक कप पाणी घालून १० ते १५ मिनिटांसाठी भिजत ठेवा. दुधाला उकळी फुटल्यानंतर त्यात भिजलेले तांदूळ घालून मिक्स करा, व तांदूळ १० मिनिटांसाठी दुधात शिजवून घ्या.

कणिक मळून ठेवली की काळी पडते? कडकही होते? ५ टिप्स; कणिक राहील मऊ - पोळ्या होतील सॉफ्ट

एका बाऊलमध्ये एक कप दूध घ्या. त्यात केसर घालून केसर दूध तयार करा. तयार केसर दूध दुधात घालून मिक्स करा, व गॅस लो फ्लेमवर ठेवा. नंतर त्यात ६ टेबलस्पून साखर आणि एक टेबलस्पून वेलची पूड घालून मिक्स करा. खीर घट्ट झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून गॅस बंद करा. अशा प्रकारे झटपट चविष्ट तांदुळाची खीर खाण्यासाठी रेडी. आपण ही खीर उपवास सोडण्यासाठी किंवा जेवल्यानंतर खाऊ शकता.

टॅग्स :महाशिवरात्रीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स