ऑफिसच्या डब्यात काय बनवाव? असा प्रश्न आपल्याला वारंवार पडतो. पालेभाज्या, कडधान्ये किंवा तेच तेच पदार्थ खाऊन वैताग देखील येतो.(Chana masala for tiffin)त्यात डब्यात कडधान्ये दिली तर अनेकजण नाक मुरडतात. चण्याची भाजी ताटात वाढली की, आपल्याला जेवण नकोसे वाटते. बरेचदा काळे चणे हे लवकर शिजत नाही. (Easy chana masala recipe)त्यामुळे ते कच्चे राहातात. खाताना अधिक चावावे लागते म्हणून आपण घरात बनवणे टाळतो. (Best chana masala for office lunch)
हॉटेल किंवा लग्न कार्यात गेल्यानंतर आपण चना मसाला किंवा काळ्या चण्याची भाजी हमखास खातो. याची चव इतकी टेस्टी लागते की, पुन्हा बनवताना आपल्याला ती कशी बनवावी हे समजत नाही.(How to pack chana masala for tiffin) कधी पदार्थाचे प्रमाण चुकते तर कधी पदार्थ नीटसा बनत नाही. त्यामुळे सकाळच्या घाई-गडबीत कडधान्य बनवताना आपल्या नकोसे वाटते. काळ्या चण्यापासून अनेक टेस्टी पदार्थ तयार केले जातात. (High-protein vegetarian lunch ideas)
काळे चणे खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. यामध्ये कांदा-लसूण आणि टोमॅटोचा योग्य प्रमाणात वापर केल्यास भाजीला वेगळीच चव येते. रस्सा दाटसर करण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर जेवणाची चव आणखी वाढते. जर आपल्यालाही डब्यासाठी चना मसाला तयार करायचा असेल तर स्टेप बाय स्टेप या रेसिपीला फॉलो करा. कमी वेळात तयार होईल, नवरा-मुले डबा आवडीने खातील.
इडली चटणी चाट, उन्हाळी सुटीतला सुपरहिट पदार्थ! मुलांनाही आवडेल खातील पोटभर आनंदाने..
साहित्य
भिजवलेले काळे चणे - १ वाटी
तेल - २ चमचा
जिरे - १ चमचा
बारीक चिरलेला लसूण - २ ते ३ पाकळ्या
बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
आले - १ इंच
लसूण पाकळी - १
टोमॅटो - १
किसलेले खोबरे - अर्धी वाटी
काळा मसाला - १ चमचा
धणे पूड - १ चमचा
लाल काश्मिरी मिरची पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर
कृती
1. सगळ्यात आधी काळे चणे रात्रभर भिजवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये काळे चणे बुडतील इतकं पाणी घाला. ४ ते ५ शिट्ट्या मारुन घ्या.
2. त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा. त्यात जिरे, ठेचलेला लसूण, बारीक चिरलेला कांदा घालून फ्राय करा.
3. आता मिक्सरच्या भांड्यात आल्याचा तुकडा, लसणाची पाकळी, किसलेले सुके खोबरे, टोमॅटो घालून वाटण तयार करा.
4. हे वाटण कढईत घालून चांगले परतवून घ्या. ५ मिनिटानंतर त्यात काळा मसाला, धणे पूड, लाल काश्मिरी मिरची पावडर घाला. मसाला चांगला परतवून घ्या.
5. यामध्ये आता शिजवलेले काळे चने घाला. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून ५ मिनिटे वाफ काढा.
6. तयार होईल झणझणीत चमचमीत चना मसाला भाजी. मुले आवडीने खातील.