Join us
Daily Top 2Weekly Top 5

गाजर हलवा नेहमीचाच! यंदा हिवाळ्यात खा गाजराची खीर, रबडीसारखी दाटसर- चवही एकदम भारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2025 18:46 IST

Carrot kheer: Gajar ki kheer: Winter special dessert: यंदाच्या हिवाळ्यात गाजराची खीर नक्की ट्राय करुन बघा.

हिवाळा सुरु झाला की बाजारात सगळीकडे लाल गाजर पाहायला मिळतात.(Carrot kheer) अशावेळी घराघरात सुगंध दरवळू लागतो तो लालचुटूक गाजरचा हलवा.(Gajar ki kheer) हिवाळ्यात गाजर घरी आणल्यावर त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.(Winter special dessert) गाजर जितकं फ्रेश, ताज आणि लालचुटुक असतील तितकाच पदार्थ चांगला आणि चविष्ट बनतो. (Healthy carrot dessert)गाजराचे लोणचे, कोशिंबीर, पराठा, सलाद किंवा गाजरचा हलवा आपण नेहमीच खातो. गाजराचा दाणेदार, गोड चवीचा हलवा हिवाळ्यात आवर्जून केला जातो. पण यंदाच्या हिवाळ्यात गाजराची खीर नक्की ट्राय करुन बघा. अगदी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने गाजराची खीर कशी करायची पाहूया. 

ना भिजवण्याचे टेन्शन, ना आंबवण्याची झंझट! १० मिनिटांत करा कुरकुरीत हिरव्या मुगाचा डोसा, पौष्टिक रेसिपी

साहित्य 

तूप - १ चमचाकिसलेले गाजर - १ वाटीदूध - १ वाटी भिजवलेला तांदूळ - अर्धी वाटी भिजवलेले काजू - ५ ते ६खडीसाखर - १ मोठा चमचाड्रायफुट्स - आवश्यकतेनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून किसून घ्या. यानंतर बासमती तांदूळ भिजवा. आता भिजवलेल्या तांदळाला मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. भिजवलेले काजू आणि खडीसाखर वाटून घ्या. 

2. कढईमध्ये तूप गरम करुन त्यात किसलेले गाजर चांगला परतवून घ्या. वरुन आवश्यकतेनुसार दूध घालून ढवळत राहा. आता मिक्सरमध्ये वाटलेली तांदळाची पेस्ट घाला. भिजवलेले काजूची पेस्ट घालून पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्या. 

3. सर्व साहित्य शिजल्यानंतर आणि खीर दाटसर झाल्यानंतर वरुन ड्रायफुट्स घाला. सर्व्ह करा खमंग-दाटसर गाजरची खीर. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Beyond Halwa: Try Carrot Kheer this Winter, a Rich, Delicious Treat

Web Summary : This winter, skip the usual carrot halwa and try carrot kheer. This simple recipe uses ingredients like ghee, carrots, milk, rice, cashews, and sugar to create a thick, flavorful dessert. Garnish with dry fruits and enjoy this unique winter treat.
टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहार