हिवाळा सुरु झाला की बाजारात सगळीकडे लाल गाजर पाहायला मिळतात.(Carrot kheer) अशावेळी घराघरात सुगंध दरवळू लागतो तो लालचुटूक गाजरचा हलवा.(Gajar ki kheer) हिवाळ्यात गाजर घरी आणल्यावर त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.(Winter special dessert) गाजर जितकं फ्रेश, ताज आणि लालचुटुक असतील तितकाच पदार्थ चांगला आणि चविष्ट बनतो. (Healthy carrot dessert)
गाजराचे लोणचे, कोशिंबीर, पराठा, सलाद किंवा गाजरचा हलवा आपण नेहमीच खातो. गाजराचा दाणेदार, गोड चवीचा हलवा हिवाळ्यात आवर्जून केला जातो. पण यंदाच्या हिवाळ्यात गाजराची खीर नक्की ट्राय करुन बघा. अगदी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने गाजराची खीर कशी करायची पाहूया.
साहित्य
तूप - १ चमचा
किसलेले गाजर - १ वाटी
दूध - १ वाटी
भिजवलेला तांदूळ - अर्धी वाटी
भिजवलेले काजू - ५ ते ६
खडीसाखर - १ मोठा चमचा
ड्रायफुट्स - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून किसून घ्या. यानंतर बासमती तांदूळ भिजवा. आता भिजवलेल्या तांदळाला मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. भिजवलेले काजू आणि खडीसाखर वाटून घ्या.
2. कढईमध्ये तूप गरम करुन त्यात किसलेले गाजर चांगला परतवून घ्या. वरुन आवश्यकतेनुसार दूध घालून ढवळत राहा. आता मिक्सरमध्ये वाटलेली तांदळाची पेस्ट घाला. भिजवलेले काजूची पेस्ट घालून पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्या.
3. सर्व साहित्य शिजल्यानंतर आणि खीर दाटसर झाल्यानंतर वरुन ड्रायफुट्स घाला. सर्व्ह करा खमंग-दाटसर गाजरची खीर.
