भारतीय जेवण कितीही साधं असलं तरी त्यातील काही पदार्थ हे जिभेची चव पुरवतात. रोजच्या जेवणाला रंगत आणायची असेल तर एक साधा पण जबरदस्त पर्याय म्हणजे लसूण चटणी.(garlic chutney recipe) आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा लसूण फक्त आरोग्यासाठी नाही तर चवीसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे.(dry garlic chutney)
अनेकदा घरात भाजी नसते, अशावेळी चटणीचा पर्याय उत्तम ठरतो. लसणाची चटणी ही फक्त भात किंवा चपातीसोबत खाल्ली जात नाही.(crispy garlic chutney) वडापाव, भजीपाव किंवा सॅण्डविचमध्ये देखील खाल्ली जाते. लसणाच्या चटणीची खरी मजा कुरकुरीतपणा आणि झणझणीत चवीत आहे. भाकरी, पोळी, वरण, डाळ आणि उसळसोबत देखील चवीने खाल्ली जाते.(homemade garlic chutney) एकदा करुन ठेवली की महिनाभर टिकते. आजकाल बाजारात तयार चटण्या सहज मिळतात, पण घरच्या घरी केलेल्या चटणीचा सुगंध आणि स्वाद वेगळाच असतो. अवघ्या १० मिनिटांत तयार होणारी लसूण चटणी कशी करायची ते पाहूया. (Maharashtrian style dry garlic chutney)
साहित्य
लसूण पाकळ्या - १० ते १२
सुक्या खोबऱ्याचा किस - १ छोटा कप
सुकलेल्या लाल मिरच्या - ५ ते ६
भाजलेले शेंगदाणे - १ कप
जिरे - १ चमचा
तीळ - १ चमचा
मीठ - चवीनुसार
लाल मसाला - १ चमचा
मिरी पावडर - १/२ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित सोलून घ्या. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचा किस तयार करा. आता एका कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस, लाल मिरच्या भाजून घ्या. आता शेंगदाणे, लसूण पाकळ्या, जिरे, तीळ घालून चांगले भाजून घ्या.
2. भाजलेले साहित्य थंड झाल्यानंतर मीठ घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर त्यात लाल मसाला आणि मिरी पावडर घालून पुन्हा वाटून घ्या. तयार होईल झणझणीत- कुरकुरीत लसणाची चटणी.