Join us

प्रवासात ८ दिवस टिकणारी भेंडी मसाला फ्राय, चिकटही होणार नाही-चवीलाही मस्त, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 12:02 IST

travel-friendly okra masala fry recipe: long-lasting bhendi fry for travel: how to keep bhendi crispy for days: प्रवासात किमान ८ दिवस तरी भेंडीची भाजी आपल्याला खाता येईल. पाहूया सोपी रेसिपी.

मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे त्यांना बाहेर फिरायला जावेसे वाटते. लांबचा प्रवास करताना आपल्याला सोबत काय घेऊन जावे असा प्रश्न सतत पडतो.(preserving crispy okra tips) बटाट्याची भाजी, चटण्या किंवा तेच तेच पदार्थ खाऊन मुलांसह आपल्याला देखील कंटाळा येतो. अशावेळी काय करावं सुचत नाही.(non-slimy bhindi fry storage) कोणतीही भाजी नेली तर ती जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे त्यासाठी लागणारे तेल, मीठ वाया जाते. (best spices to preserve okra fry)प्रवासात असताना आपण मेथीचे थेपले, बटाट्याचा पराठा, बेसनाचा पोळा असे अनेक पदार्थ घेऊन जातो.(dehydrated masala bhindi recipe) पण कधी भेंडी मसाला फ्राय घेऊन गेलाय का? भेंडीची भाजी चिकट असल्यामुळे ती जास्त दिवस टिकत नाही.(how to keep bhendi crispy for days) त्यामुळे ती प्रवासात घेऊन आपण शक्यतो टाळतो परंतु, एक सोपी ट्रिक सांगितली तर प्रवासात किमान ८ दिवस तरी भेंडीची भाजी आपल्याला खाता येईल. पाहूया सोपी रेसिपी. 

पावसाळ्यात झटपट विकतसारखं घट्ट मलईदार दही लावण्यासाठी २ सोप्या टिप्स, परफेक्ट वड्या पडतील-चवीलाही गोड

साहित्य 

भेंडी - आवश्यकतेनुसार भाजलेले शेंगदाणे - १ वाटीसुके खोबरे - १ कप कढीपत्ता - ५ ते ६ पानेलसूण पाकळ्या - ७ ते ८ आल्याचा तुकडा - १ इंच जिरे - १ चमचा बडीशेप - १ चमचा धने पावडर - १ चमचा जिरे पावडर - १ चमचा लाल मिरची - १ चमचाहळद - १ चमचा तेल - आवश्यकतेनुसार कोथिंबीर - आवश्यकतेनुसार मीठ - चवीनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी भेंडी धुऊन ती स्वच्छ पुसून घ्या. नंतर त्याला बारीक चिरून घ्या. 

2. आता कढईत तेल तापवून भेंडी चांगली तळून घ्या. चाळणीमध्ये भेंडी काढून ठेवा, ज्यामुळे अतिरिक्त तेल निघून जाईल. 

3. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे, कढीपत्ता, लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा, जिरे, बडीशेप आणि मसाले घालून मिश्रण चांगले वाटून घ्या. 

4. कढईत तेल तापवून त्यात जिरे तडतडू द्या. त्यात मसाला आणि कोथिंबीर घालून चांगले परतवून घ्या. मीठ घालून चांगले मिक्स करा. वरुन तळलेली भेंडी घालून पुन्हा एकदा एकजीव करा. 

टॅग्स :अन्नपाककृती