Lokmat Sakhi >Food > भेंडीची भाजी चिकट - गिळगिळी होते? ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरा, बेसन भेंडी होईल जबरदस्त चविष्ट!

भेंडीची भाजी चिकट - गिळगिळी होते? ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरा, बेसन भेंडी होईल जबरदस्त चविष्ट!

Okra recipe: besan bhendi : Crispy bhindi recipe: बेसन भेंडी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 09:30 IST2025-09-10T09:30:00+5:302025-09-10T09:30:02+5:30

Okra recipe: besan bhendi : Crispy bhindi recipe: बेसन भेंडी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

How to make bhendi bhaji without stickiness Easy gram flour bhendi bhaji recipe for lunch Traditional Indian style besan bhendi | भेंडीची भाजी चिकट - गिळगिळी होते? ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरा, बेसन भेंडी होईल जबरदस्त चविष्ट!

भेंडीची भाजी चिकट - गिळगिळी होते? ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरा, बेसन भेंडी होईल जबरदस्त चविष्ट!

आपल्यापैकी अनेकांच्या घरात भेंडीची भाजी आवडीने खाल्ली जाते. पण शिजवताना चिकट, गिळगिळीत होते त्यामुळे त्याची चव बिघडते.(Okra recipe) किती वेळा धुतली, कापताना पुसून घेतली किंवा वेगवेगळ्या पद्धतीने शिजवली तरी भेंडीला चिकटपणा येतो.(bhendi recipe without stickiness) त्यामुळे काही वेळा भेंडीची भाजी करण्याऐवजी अनेक लोक दुसरी भाजी करण्यास पसंती देतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असते. पण  भेंडीची भाजी करताना ही ट्रिक वापरली तर भाजी अधिक चविष्ट होईल आणि चिकटपणा निघून जाईल. (Besan bhendi recipe)
भेंडीची भाजी करताना आपल्याला त्यात बेसनाचे पीठ घालावे लागेल. यामुळे भाजीचा चिकटपणा नाहीसा होईल आणि भाजीला छान खमंग चव येईल.(Crispy bhindi recipe) ही बेसन भेंडी कशी बनवायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

ढाब्यावर मिळणारा कुरकुरीत कांदा पराठा करा घरीच, ६ टिप्स - पीठ होईल परफेक्ट, पराठा टम्म फुगेल

साहित्य 

भेंडी - ३०० ग्रॅम
बेसनाचे पीठ - अडीच चमचे
तेल - २ चमचे 
मोहरी - १ चमचा 
जिरे - १ चमचा 
हिंग - चिमूटभर 
कढीपत्ता
मध्यम आकारात चिरलेला कांदा - १ 
आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट - दीड चमचा 
टोमॅटो चिरलेला - १ 
गरम मसाला पावडर - १ चमचा 
लाल मिरची पावडर - अर्धा चमचा 
मीठ- चवीनुसार 
हळद - १/४ चमचा 
आमचूर पावडर - अर्धा चमचा 
कोथिंबीर

इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली

कृती 

1. सगळ्यात आधी भेंडी धुवून स्वच्छ करा. त्यानंतर ती एकाच आकारात चिरून ठेवा. आता एका भांड्यात बेसनाचे पीठ घेऊन त्यात पाणी घाला. बेसनाची पेस्ट ही जास्त पातळ किंवा जाडसर नसावी. पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याकडे लक्ष द्याल. 

2. आता चिरलेल्या भेंडीमध्ये बेसनाची पेस्ट घाला. चमच्याने सर्व पीठ एकजीव करा. आता कढईत तापवून त्यात तेल गरम करुन मंद आचेवर भेंडी परतवून घ्या. ५ ते ७ मिनिटांमध्ये बेसनाचा रंग बदलेल. यामुळे भेंडी व बेसन चांगले भाजले जाईल. भेंडी काढून घ्या. 


3. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, कांदा घालून चांगले परतवून घ्या. त्यात आले- लसूण- हिरवी मिरची पेस्ट घालून पुन्हा चांगले परतवून घ्या. त्यात टोमॅटो आणि उरलेले मसाले घालून पुन्हा चांगले परतवून घ्या. त्यात तयार भेंडी घालून एकसारखे परतवून घ्या. मस्त चटपटीत- आगळीवेगळी बेसन भेंडी तयार होईल.

Web Title: How to make bhendi bhaji without stickiness Easy gram flour bhendi bhaji recipe for lunch Traditional Indian style besan bhendi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.