नेहमीच्या जेवणात चपाती खायचा कंटाळा आला की आपण, भाकरी करतो. काहीवेळा अनेकांच्या घरी हमखास रात्रीच्या जेवणात भाकरी करण्याचा नियम असतो. काहीवेळा जास्तीची भाकरी (How To Make Bhakricha Chivda At Home) केली किंवा भाकऱ्या उरल्या तर आपण त्या फेकून न देता दुसऱ्या (Fodanichi Bhakri) दिवशी खाण्यासाठी ठेवतो. परंतु दुसऱ्या दिवशी या भाकऱ्या सुकून कडक, कोरड्या होतात. अशा कोरड्या, कडक झालेल्या भाकऱ्या खाव्याशा वाटत नाही. अशावेळी आपण अगदी झटपट या भाकरीचा मस्त झणझणीत, चटपटीत, कुरकुरीत चिवडा तयार करून खाऊ शकतो(Bhakricha Chivda).
भाकरी उरलेली असेल तर ती अशी वाया जाऊ न देता, तीच वेगळ्या पदार्थात रूपांतर केलं तर घरातील सगळेच अगदी आवडीने भाकरीचा चिवडा खातील.उरलेल्या भाकरीचा चटपटीत, चिवडा हा नाश्त्यासाठी एक उत्तम पदार्थ होऊ शकतो. कोथिंबीर, खोबरं आणि लिंबाचा रस घालून चिवड्याला एकदम अफलातून चव दिली जाते. शिळ्या भाकरीचा चिवडा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. उरलेल्या भाकऱ्या - ४ ते ५
२. पाणी - २ ते ३ टेबलस्पून
३. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
४. मोहरी - १ टेबलस्पून
५. जिरे - १ टेबलस्पून
६. कडीपत्ता - ६ ते ८ पानं
७. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
८. हळद - १/२ टेबलस्पून
९. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१०. मीठ - चवीनुसार
११. दाण्याचा कूट - १/२ कप
१२. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
१३. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
बेसन नको, फक्त १५ मिनिटांत करा डाळ तांदुळाचा लुसलुशीत ढोकळा - चवीला उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक...
लोणच्यासाठी परफेक्ट कैरी कशी निवडाल? ‘या’ ३ प्रकारच्याच कैऱ्या लोणच्यासाठी उत्तम-वर्षभर टिकेल सहज...
कृती :-
१. सगळ्यात आधी उरलेल्या भाकऱ्या मोडून त्यांचे लहान - लहान तुकडे करून घ्यावेत. आता या भाकरीच्या तुकड्यांवर हलकेच पाणी शिंपडून घ्यावे.
२. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे, कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालूंन खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी.
३. तयार फोडणीत हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला घालावा.
४. आता यात उरलेल्या भाकरीचे लहान - लहान करून घेतलेले तुकडे घालावेत. २ ते ३ मिनिटे मसाल्यात भाकरी परतवून घ्यावी.
५. सगळ्यात शेवटी या भाकरीच्या चिवड्यात शेंगदाण्याचा कूट, लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
मस्त चमचमीत, झणझणीत उरलेल्या भाकरीचा कुरकुरीत चिवडा खाण्यासाठी तयार आहे.