डोसा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. सकाळच्या नाश्त्यामध्ये हल्ली घरोघरी इडली, डोसा आवडीने खाल्ला जातो. मसाला डोसा, प्लेन डोसा, चीज डोसा असे डोशाचे वेगवेगळे प्रकार आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. पण सगळ्यात प्रसिद्ध डोसा म्हणजे बेन्ने डोसा. (benne dosa recipe)डोसा म्हटलं की भिजवणं, वाटणं आणि आंबवणं हे सगळं आठवतं. त्यामुळे अनेकदा डोशाचा विकत आणून खाल्ला जातो. पण जर न भिजवता, न वाटता आणि न आंबवता अवघ्या १५ मिनिटांत जाळीदार बेन्ने डोसा करता येईल. बेन्ने डोसा हा कर्नाटकातील लोकप्रिय पदार्थ आहे.(instant dosa recipe) त्याचा खासपणा म्हणजे त्याची पातळ, जाळीदारपणा आणि मऊसर, किंचित कुरकुरीत चव. या झटपट रेसिपीत कोणतीही पूर्वतयारी लागत नाही, त्यामुळे अचानक पाहुणे आले तरी सहज करता येते. कमी साहित्यात झटपट बनवता येणारा बेन्ने डोसा. (south indian breakfast)
साहित्य
रवा - १ वाटी बेसन - १ चमचा गव्हाचे पीठ - १ चमचासाखर - ४ चमचे इनो - १ चमचा मीठ - चवीनुसार तूप - १ चमचा दही - अर्धा कप
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात रवा, दही, बेसन, गव्हाचे पीठ,मीठ आणि साखर घालावी लागेल.
2. यात थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. चांगले एकजीव आणि पीठ मऊ व्हायला हवे.
3. यानंतर हे बॅटर एका भांड्यात घेऊन त्यात इनो घाला. वरुन चमचाभर पाणी घालून मिश्रण फेटून घ्या. ५ मिनिटे हे पीठ झाकून ठेवा.
4. तव्याला तेल किंवा तूप लावून ग्रीस करुन घ्या. बॅटर पसरवून घ्या. वरुन बटर किंवा तूप लावा. आपल्याकडे पोडी मसाला असेल तर तोही घालू शकता. यात बटाट्याच्या भाजीचा मसाला देखील आपण घालू शकतो. चटणी-सांभारसोबत सर्व्ह करा कुरकुरीत बेन्ने डोसा.
Web Summary : Craving dosa? Make instant, lacy Benne Dosa in 15 minutes! This popular Karnataka dish requires no soaking or grinding. A quick and easy South Indian breakfast recipe, perfect even for unexpected guests.
Web Summary : डोसा खाने का मन है? 15 मिनट में तुरंत, जालीदार बेन्ने डोसा बनाएं! इस लोकप्रिय कर्नाटक व्यंजन को भिगोने या पीसने की आवश्यकता नहीं है। यह एक त्वरित और आसान साउथ इंडियन नाश्ता रेसिपी है, जो अप्रत्याशित मेहमानों के लिए भी एकदम सही है।