lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पारंपरिक बंगाली मिष्टी दोई आता करा घरी चटकन, गोड खाऊनही वजन वाढायची भीती नाही...

पारंपरिक बंगाली मिष्टी दोई आता करा घरी चटकन, गोड खाऊनही वजन वाढायची भीती नाही...

Mishti Doi Recipe With Jaggery : जेवल्यानंतर गोड खावंसं वाटतं? त्यासाठी हा बंगाली पदार्थ नक्की खाऊन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 04:13 PM2023-07-19T16:13:53+5:302023-07-19T16:29:14+5:30

Mishti Doi Recipe With Jaggery : जेवल्यानंतर गोड खावंसं वाटतं? त्यासाठी हा बंगाली पदार्थ नक्की खाऊन पाहा...

How To Make Bengali Special Mishti Doi Recipe At Home. | पारंपरिक बंगाली मिष्टी दोई आता करा घरी चटकन, गोड खाऊनही वजन वाढायची भीती नाही...

पारंपरिक बंगाली मिष्टी दोई आता करा घरी चटकन, गोड खाऊनही वजन वाढायची भीती नाही...

आपल्या रोजच्या आहारात आपण दही आणि ताकाचा आवर्जून समावेश करतोच. दही खाणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरीमध्ये दह्याचा वापर केला जातो. निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. सध्या बाजारात विविध ब्रॅन्डचे फ्लेवर्ड दही सहज उपलब्ध होते. परंतु घरी बनवलेल्या दह्याची चव आणि ते खाण्याची गंमत काही वेगळीच असते. 

पूर्वी आपण जेवताना पानांत तोंडी लावायला म्हणून दही वाढून घ्यायचो. परंतु आता याच दह्याने स्वीट डिशची जागा घेतली आहे. आजकाल बरेचजण जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते, म्हणून फ्लेवर्ड दही खाण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. काहीवेळा आपण बाहेर भरपूर पैसे देऊन वेगवेगळ्या फ्लेवरचे दही विकत घेऊन खातो. यात मँगो फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, कॅरेमल फ्लेवर अशा विविध फ्लेवर मध्ये दही उपलब्ध असते. परंतु आता आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात व पुरवठ्याला येणारे असे बंगाली स्पेशल मिष्टी दोई बनवू शकतो. मिष्टी दोई एक बंगाली गोड रेसिपी आहे, जी बंगाल राज्यातील प्रत्येक घरात बनविली जाते. कुटुंबात कोणताही विशेष प्रसंग असो, उपवास असो किंवा कोणताही सण, मिष्टी दह्याशिवाय सर्व काही अपूर्ण वाटते. जर आपल्या घरातील सगळ्यांनाच जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची सवय असेल तर आपण या हेल्दी आणि पौष्टिक मिष्टी दह्याचा पर्याय निवडू शकता(How To Make Bengali Special Mishti Doi Recipe At Home). 

साहित्य :- 

१. गूळ - १/२ कप 
२. पाणी - १/२ कप 
३. फुल क्रिम दूध - १  लिटर 
४. मिल्क पावडर - ४ टेबलस्पून 
५. दही - २ टेबलस्पून 
६. केशर - १/२ टेबलस्पून 
७. पिस्त्याचे पातळ काप - १ टेबलस्पून 

महागडा सुकामेवा पावसाळ्यात सादळू नये म्हणून ४ टिप्स, बदाम-काजू-अंजीर टिकतील छान...

कृती :- 

१. सर्वप्रथम एक भांडे घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर किंचितचे गरम करून घ्यावे. 
२. त्यानंतर त्यात गुळाचे बारीक तुकडे घालून गूळ व्यवस्थित वितळवून घ्यावा. 
३. गूळ संपूर्णपणे वितळून झाल्यानंतर त्यात थोडेसे पाणी घालावे. आता गुळाच्या गुठळ्या होऊ न देता तो व्यवस्थित पाण्यांत विरघळवून त्याचा पातळसर पाक बनवून घ्यावा. 
४. आता एका मोठ्या भांड्यात गरम दूध ओतून घेऊन त्यात मिल्क पावडर घालून ती व्यवस्थित दुधात विरघळवून घ्यावी. 
५. त्यानंतर या दुधात मिल्क पावडर विरघळल्यानंतर गुळाचा तयार केलेला पाक ओतून घ्यावा. 

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

टम्म फुगलेली रवा - मसाला पुरी आणि आल्याचा चहा ! नाश्ता असा भारी, खा खमंग मसाला पुरी...

६. आता या दुधाच्या मिश्रणात तयार दही घालून हे सगळे मिश्रण ढवळवून घ्यावे.   
७. यानंतर एक मातीचे भांडे घेऊन त्यात चमचाभर दही घालून हे दही भांड्याला आतल्या बाजूने सगळीकडे पसरवून लावावे. 
८. आता हे दही तयार होण्यासाठी एका गरम किंवा उबदार जागी ठेवून द्यावे. (दह्यापेक्षा मिष्टी दही जमण्यास अधिक वेळ लागतो.) आपण संपूर्ण एक रात्र हे दही जमण्यास ठेवून द्यावे. 
९. मिष्टी दोई घट्ट व दाटसर बनून तयार झाल्यानंतर त्यावर आपल्या आवडीनुसार, केशर व पिस्त्याचे पातळ काप भुरभुरवून घ्यावेत. 

आता आपले बंगाली स्पेशल 'मिष्टी दोई' खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: How To Make Bengali Special Mishti Doi Recipe At Home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.