Lokmat Sakhi >Food > अंगारकी चतुर्थी: बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा खास केळीचे मोदक! मुलंही खातील मजेत-पौष्टिक आणि चविष्ट मोदक

अंगारकी चतुर्थी: बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा खास केळीचे मोदक! मुलंही खातील मजेत-पौष्टिक आणि चविष्ट मोदक

Angarki Chaturthi recipes: Banana modak recipe: Traditional modak recipe: अगदी घाईच्या वेळी आणि कमी साहित्यात झटपट होणारे केळ्याचे मोदक कसे बनवायचे पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2025 16:55 IST2025-08-11T16:01:02+5:302025-08-11T16:55:11+5:30

Angarki Chaturthi recipes: Banana modak recipe: Traditional modak recipe: अगदी घाईच्या वेळी आणि कमी साहित्यात झटपट होणारे केळ्याचे मोदक कसे बनवायचे पाहूया.

How to make banana modak for Angarki Chaturthi tasty modak recipe for kids Step-by-step banana modak recipe | अंगारकी चतुर्थी: बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा खास केळीचे मोदक! मुलंही खातील मजेत-पौष्टिक आणि चविष्ट मोदक

अंगारकी चतुर्थी: बाप्पाच्या नैवेद्यासाठी करा खास केळीचे मोदक! मुलंही खातील मजेत-पौष्टिक आणि चविष्ट मोदक

मंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं.(Angarki Chaturthi recipes) या दिवशी बाप्पााच्या आवडीचे मोदक केले जातात.(Banana modak recipe) गणपती बाप्पाच देखील लवकरच आगमन होणार आहे. या दहा दिवसांत आपण वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बाप्पासाठी करतो.(Traditional modak recipe) पण अनेकदा तळणीचे, उकडीचे मोदक करताना ते फुटतात किंवा फसतात. पण यंदा आपण बाप्पासाठी केळीचे मोदक ट्राय करुया.(Chaturthi special sweets) या मोदकांना काही ठिकाणे केळीचे अप्पे, केळीचे वडे तर काही ठिकाणी मुकुलू असं देखील म्हटलं जातं. अगदी घाईच्या वेळी आणि कमी साहित्यात झटपट होणारे केळ्याचे मोदक कसे बनवायचे पाहूया.(Easy banana modak) यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या. 

Shravan Special: श्रावण सोमवारी करा उपवासाची झणझणीत मिसळ! तोंडाला येईल चव-चमचमीत पदार्थ खाऊन बघाच

साहित्य 

केळी - ३
बारीक रवा - दीड वाटी
साखर - १ वाटी
तूप - ४ ते ५ चमचे
डेसिकेटेड कोकोनट - १/४ वाटी 
साखर - १/४ वाटी 
कोमट केशर दूध -  १/२ वाटी
वेलची पूड 
खसखस - दीड चमचा 
ड्रायफ्रूट्स - आवडीनुसार 
 

कृती 

1. सगळ्यात आधी केळी मॅश करुन त्यात साखर आणि डेसिकेटेड कोकोनट घालून व्यवस्थित एकजीव करा. आता कढईत तूप घालून त्यात मनुके व्यवस्थित फुलवून घ्या. त्यात खसखस घाला. यामध्ये मॅश केलेल्या केळीचे सारण घाला. रंग बदलेपर्यंत चांगले परतवून घ्या. 

2. यानंतर कढईत रवा चांगला भाजून घ्या. वरुन तूप घालून पुन्हा लालसर होईपर्यंत भाजून घ्या. रवा काढून प्लेटमध्ये ठेवा. आता कढईत पुन्हा तूप घेऊन त्यात मॅश केलेली केळी घाला. तूपात केळी चांगली परतवून घ्या. साखर घालून वितळवून घ्या. त्यात भाजलेला रवा घालून मिश्रण चांगले एकजीव करा. वरुन केशर दूध घालून रवा चांगला फुलू द्या. डायफ्रुट्स घालून परतवून घ्या. 

3. तयार मिश्रण ताटात घेऊन पीठासारखे हाताने मळा. केळीच्या तयार मिश्रणाचे गोळे करुन घ्या. त्यानंतर साच्यामध्ये तयार पीठ भरून त्यात केळीचे सारण भरा. व्यवस्थित आकार देऊन वरुन ड्रायफ्रुट्स लावा. तयार होतील केळीचे मोदक. 

Web Title: How to make banana modak for Angarki Chaturthi tasty modak recipe for kids Step-by-step banana modak recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.