आपल्या स्वयंपाकघरात अनेक पीठ असतात. ज्याचा आपल्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. पण नेमकं हे पीठ वापरायचं कसे हा देखील प्रश्न असतो.(bajra recipes) बाजरी, नाचणी यांचे पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी वापरतो. किंवा लहान मुलांना याची पेच बनवून खाऊ घालतो. पण या पीठापासून आपण सकाळचा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवू शकतो. (healthy breakfast ideas)खरंतर बाजरीला सुपरफूड म्हणून ओळखले जाते.(bajra pancake recipe) यात भरपूर फायबर, प्रोटीन, लोह असतं. आपण या पीठापासून आपण पौष्टिक धिरडे बनवू शकतो.(weight loss breakfast) हे धिरडे खाल्ल्यावर भूक लागणार नाही.(protein rich Indian breakfast) वजन कमी करायचं असेल तर हा सकाळचा नाश्ता बेस्ट ठरेल. या धिरड्यामध्ये आपण विविध भाज्या घालून त्याची टेस्ट वाढवू शकतो. पौष्टिक, टेस्टी आणि घरच्यांना खुश करणारा हा नाश्ता एकदा करून पाहा. (gluten free bajra breakfast ideas)
डोशाचं पीठ उरलं तर करा झटपट ५ पदार्थ, एकाच पीठात चमचमीत पदार्थ-नाश्ता गरमागरम
साहित्य
बाजरीचे पीठ - १ कप दही - १ कप मीठ - चवीनुसार आले-लसूण पेस्ट - १ चमचा ओवा - १ चमचा हिरवी मिरची पेस्ट - १ चमचाबारीक चिरलेला टोमॅटो - १ कप बारीक चिरलेली कोबी - १ कप किसलेले गाजर - १ कप बारीक चिरलेली सिमला मिरची - १ कप तीळ - आवश्यकतेनुसार कोथिंबीर- आवश्यकतेनुसार तूप
Navratri 2025 Fast Special Recipe : फक्त १५ मिनिटात करा उपवासाचा पराठा, रेसिपी सोपी आणि पचायला हलकी
कृती
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ घ्या. त्यात दही, मीठ, ओवा, हिरवी मिरची- आले-लसूण पेस्ट घाला. आता त्यात थोडे पाणी त्याचे बॅटर तयार करुन घ्या. चमच्याने व्यवस्थित फिरवून घ्या.
2. आता त्यात किसलेले गाजर, बारीक चिरलेली सिमला मिरची, कोबी आणि बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर घालून पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घ्या.
3. पॅन गरम करुन त्यावर थोडे तूप पसरवा. आता धिरड्याचे बॅटर पॅनवर पसरवा आणि वरुन तीळ आणि तूप लावा. दोन्ही बाजून खरपूस भाजून घ्या. पुदिन्याच्या चटणीसोबत खा, गरमागरम बाजरीचे पौष्टिक धिरडे.