Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या पाहुणचाराची शान, चमचमीत मालवणी डाळ! पाहा डाळ करण्याची पारंपरिक अचूक रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2026 12:50 IST

Malvani dal recipe: Konkan style dal: authentic Malvani food: मालवणी डाळ कशी करायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते समुद्रकिनारे, नारळ-पोफळीच्या बागा आणि जिभेवर रेंगाळणारी अस्सल मालवणी चव. मालवणी जेवण म्हणजे फक्त मासे किंवा मटण नाही तर इथल्या शाकाहारी पदार्थांमध्येही वेगळीच जादू असते.(Malvani dal recipe) त्यातल्या त्यात मालवणी डाळ किंवा डाळीची आमटी. हे साध्या वरण-भातालाही मागे टाकतात. साधं वरण तर आपण रोजच खातो, पण मालवणी डाळ ही चवीला अप्रतिम लागते. वाफाळलेला भात, त्यावर ही चमचमीत मालवणी डाळ आणि सोबत एखादी तळलेली काचरी किंवा पापड असेल, तर पंचपक्वान्नही यासमोर फिकी पडतील.(Konkan style dal) ही डाळ करण्याची पद्धत जितकी सोपी आहे, तितकीच ती चवीला चांगली आहे. जर आपल्यालाही रोजच्या वरणाचा कंटाळा आला असेल, जिभेला काहीतरी झणझणीत हवं असेल, तर मालवणी डाळ एकदा करुन पाहा.(authentic Malvani food) ही डाळ कशी करायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

कोबीच्या पानांची भाजी नाही भजी करा, चमचमीत- कुरकुरीत पदार्थ; मिरची भजीपेक्षा भारी चव, पाहा रेसिपी

मालवणी डाळीसाठी लागणारे साहित्य 

सुके खोबरे- १ कप ओले खोबरे - १/२ कप लसूण - ६ ते ७ पाकळ्याआले- १ इंच काळी मिरी - ६ ते ७लवंग - ३ ते ४दालचिनी - १ छोटा तुकडातेल - ३ ते ४ मोठे चमचेमोहरी - १ चमचा जिरे - १ चमचा कढीपत्ता - ८ ते १० पानेसुक्या लाल मिरच्या -२कोथिंबीर - २ मोठे चमचेहळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा तूर डाळ - १ कप टोमॅटो - १हिंग - चिमूटभरमीठ - चवीनुसारपाणी - १ कपकोकम - ५ ते ६ पाकळ्या

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला तुरीची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवावी लागेल. त्यानंतर कुकरमध्ये तुरीची डाळ, टोमॅटो, हिंग, मीठ आणि मीठ घालून ३ ते ४ शिट्ट्या करा. 

2. यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, सुके खोबरे, लसूण,आले, काळे मिरी, लवंग, दालचिनी वाटून त्याची पेस्ट तयार करा. 

3. आता कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, सुक्या मिरच्या, कोथिंबीर, तयार पेस्ट, हळद आणि लाल मिरची पावडर घालून तेलात चांगले परतवून घ्या. 

4. त्यात शिजलेली डाळ थोडी घोटवून घ्या. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात शिजलेली डाळ घाला. मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून ते पाणी डाळीत घाला. यामुळे डाळीला चव येईल. 

5. वरुन मीठ आणि कोकम घालून डाळीला छान उकळी येऊ द्या. गरमागरम भातासोबत खा मालवणी डाळ. 

English
हिंदी सारांश
Web Title : Malvani Dal Recipe: A Taste of Konkan Hospitality

Web Summary : Experience Konkan's culinary magic with Malvani Dal! This simple recipe transforms everyday lentils into a flavorful delight, perfect with rice and a side of crispy papad. A must-try for a zesty twist.
टॅग्स :अन्नपाककृती