कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते समुद्रकिनारे, नारळ-पोफळीच्या बागा आणि जिभेवर रेंगाळणारी अस्सल मालवणी चव. मालवणी जेवण म्हणजे फक्त मासे किंवा मटण नाही तर इथल्या शाकाहारी पदार्थांमध्येही वेगळीच जादू असते.(Malvani dal recipe) त्यातल्या त्यात मालवणी डाळ किंवा डाळीची आमटी. हे साध्या वरण-भातालाही मागे टाकतात.
साधं वरण तर आपण रोजच खातो, पण मालवणी डाळ ही चवीला अप्रतिम लागते. वाफाळलेला भात, त्यावर ही चमचमीत मालवणी डाळ आणि सोबत एखादी तळलेली काचरी किंवा पापड असेल, तर पंचपक्वान्नही यासमोर फिकी पडतील.(Konkan style dal) ही डाळ करण्याची पद्धत जितकी सोपी आहे, तितकीच ती चवीला चांगली आहे. जर आपल्यालाही रोजच्या वरणाचा कंटाळा आला असेल, जिभेला काहीतरी झणझणीत हवं असेल, तर मालवणी डाळ एकदा करुन पाहा.(authentic Malvani food) ही डाळ कशी करायची, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
कोबीच्या पानांची भाजी नाही भजी करा, चमचमीत- कुरकुरीत पदार्थ; मिरची भजीपेक्षा भारी चव, पाहा रेसिपी
मालवणी डाळीसाठी लागणारे साहित्य
सुके खोबरे- १ कप
ओले खोबरे - १/२ कप
लसूण - ६ ते ७ पाकळ्या
आले- १ इंच
काळी मिरी - ६ ते ७
लवंग - ३ ते ४
दालचिनी - १ छोटा तुकडा
तेल - ३ ते ४ मोठे चमचे
मोहरी - १ चमचा
जिरे - १ चमचा
कढीपत्ता - ८ ते १० पाने
सुक्या लाल मिरच्या -२
कोथिंबीर - २ मोठे चमचे
हळद - १ चमचा
लाल तिखट - १ चमचा
तूर डाळ - १ कप
टोमॅटो - १
हिंग - चिमूटभर
मीठ - चवीनुसार
पाणी - १ कप
कोकम - ५ ते ६ पाकळ्या
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला तुरीची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवावी लागेल. त्यानंतर कुकरमध्ये तुरीची डाळ, टोमॅटो, हिंग, मीठ आणि मीठ घालून ३ ते ४ शिट्ट्या करा.
2. यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, सुके खोबरे, लसूण,आले, काळे मिरी, लवंग, दालचिनी वाटून त्याची पेस्ट तयार करा.
3. आता कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता, सुक्या मिरच्या, कोथिंबीर, तयार पेस्ट, हळद आणि लाल मिरची पावडर घालून तेलात चांगले परतवून घ्या.
4. त्यात शिजलेली डाळ थोडी घोटवून घ्या. मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात शिजलेली डाळ घाला. मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून ते पाणी डाळीत घाला. यामुळे डाळीला चव येईल.
5. वरुन मीठ आणि कोकम घालून डाळीला छान उकळी येऊ द्या. गरमागरम भातासोबत खा मालवणी डाळ.
