Join us
Daily Top 2Weekly Top 5

डब्यात तीच ती भाजी खाऊन कंटाळलात? करा गवारीचा झणझणीत ठेचा, तोंडी लावायला गावरान चटकदार रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2025 15:33 IST

Gavari recipe: Gavari thecha: Maharashtra traditional recipes: गवारीचा झणझणीत ठेचा कसा करायचा पाहूया.

दररोज तिच भाजी, सारखं वरण-भात किंवा नेहमीचा पातळ रस्सा खाऊन आपल्यापैकी अनेकांना कंटाळा येतो. (Gavari recipe) आपल्याला काहीतरी तिखट-झणझणीत आणि वेगळ्याच चवीचे पदार्थ खाण्याची इच्छा होते.(Maharashtra traditional recipes) झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली की आपण ठेचा किंवा मसालेदार पदार्थ खातो. पाहायला गेलं तर गवारीची भाजी ही फार लोकांची नावडती.(Spicy Indian side dish) अगदी परतून केलेली असो, दाण्याचा कूट घातलेली असो. पण ग्रामीण भागात अनेकजण आवडीने गवार खातात.(Gavar sabzi recipe) कोवळी गवार चवीला अगदी छान लागते. पण बरेचदा गवारीची भाजी खाऊनही कंटाळा येतो. अशावेळी आपण गवारीचा झणझणीच ठेचा खाऊ शकतो. (Village-style recipes)ग्रामीण भागात ठेच्याला अधिक महत्त्व आहे. भाज्यांचा किंवा मिरचीचा ठेचा जितका साधा असतो तितकीच त्याची चव चांगली. हा ठेचा कमी साहित्य, झणझणीत चव आणि जेवणात तोंडी लावायला एकदम मस्त. एकदा केला की पुन्हा-पुन्हा कराल. गवारीचा झणझणीत ठेचा कसा करायचा पाहूया. 

वयाच्या चाळिशीनंतरही दिसायचे तरुण? चेहऱ्याला लावा 'हे' पाणी, त्वचा होईल तजेलदार-हायड्रेटेड- सुरकुत्याही दिसणार नाही

साहित्य 

गवार - १ वाटी तेल - आवश्यकतेनुसार शेंगदाणे- १ कप लसूण पाकळ्या - १० ते १२फिक्या हिरव्या मिरच्या - ७ ते ८हिरव्या मिरच्या - २ ते ३मीठ - चवीनुसार जिरे - १ चमचा बारीक चिरलेला कोथिंबीर - १ मोठा चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी गवार स्वच्छ धुवून बारीक तोडून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये तेल गरम करुन गवार परतवून घ्या. आता थंड होण्यास ठेवा. 

2. पॅनमध्ये पुन्हा तेल गरम करुन त्यात शेंगदाणे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या घालून चांगले परतवून घ्या. आता थंड झालेली गवार खलबत्त्यामध्ये कुटून घ्या. यानंतर परतवलेल्या शेंगदाण्याचे मिश्रण देखील व्यवस्थित कुटून घ्या. 

3. पॅनमध्ये तेल घालून त्यात जिरे घाला. कुटलेली गवार आणि शेंगदाण्याचे मिश्रण घाला वरुन मीठ, कोथिंबीर घालून चांगले परतवून घ्या. तयार होईल गवारीचा झणझणीत ठेचा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Spicy Cluster Bean Relish: A Flavorful Village-Style Recipe to Enjoy

Web Summary : Tired of the same old lunch? Try this spicy and flavorful cluster bean relish, a traditional village-style recipe. This simple dish uses minimal ingredients and offers a delicious, unique taste. Perfect as a side to spice up any meal!
टॅग्स :अन्नपाककृती