गोड-धोड आणि साधा वरण भात खाऊन आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. रोजच्या जेवणात भाजी काय बनवायची हा देखील प्रश्न असतो.(spicy Indian thecha recipe) भाजी कितीही वेगळ्याप्रकारे बनवली तरी घरातील मंडळींचे खाण्यास अधिक नाटक असते.(dodka thecha recipe) अनेकदा आपल्याला भाकरी आणि ठेचा खाण्याची इच्छा होते. पण ठेचा म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर दिसू लागतात त्या हिरव्या मिरच्या, लसूण आणि झणझणीत चव. पण कधी दोडक्याचा ठेचा खाल्ला आहे का? ही साधी पण कमी महत्त्वाची वाटणारी भाजी जेव्हा ठेचाच्या रुपात खाल्ली जाते तेव्हा तिची चव अप्रतिम लागते. दोडक्याचा ठेचा कसा बनवायचा, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
Pitru Paksha 2025 : श्राद्ध भोजनात करा पारंपरिक भोपळ्याची भाजी, चुकूनही घालू नका ‘या’ २ गोष्टी
साहित्य
बारीक चिरलेला दोडका - १ वाटी भाजलेले शेंगदाणे - १/४ कप हिरव्या मिरच्या - २ ते ३लसूण पाकळ्या - ५ ते ६ जिरे - १ चमचा कोथिंबीर - मीठ - चवीनुसार हिंग - १ चमचालिंबाचा रस भाजलेले तीळ - १ चमचा तेल
गरमागरम वरण-भातासोबत खा कारल्याचे मसालेदार कुरकुरीत काप, सोपी रेसिपी
कृती
1. सगळ्यात आधी दोडके स्वच्छ धुवून त्याच्या वरचे साल काढून घ्या. नंतर त्याचे बारीक काप करा. आता मिक्सरच्या भांड्यात दोडक्याचे काप, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि जिरे घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा.
2. आता कढईत तेल चांगले गरम करुन त्यात जिरे तडतडू द्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातील ठेचा, भाजलेले शेंगदाणे, मीठ, हिंग घालून चांगले परतवून घ्या. वरुन लिंबाचा रस पिळा. पुन्हा चांगले परतवून घ्या.
3. गरमागरम भाकरी सोबत खा, दोडक्याचा झणझणीत ठेचा.