गावाकडचं जेवण म्हणजे साधं, सरळ आणि मन तृप्त करणारं. पण याठिकाणी मिळणारे पदार्थ आणि त्याची चव ही वेगळीच. गावकडे आवडीने खाल्ली जाणारी शेव-टोमॅटो भाजी.(Sev tomato bhaji) दिसायला जितकी साधी, तितकीच तिची चव जबरदस्त.(Shev tomato recipe) कमी वेळात, घरात भाजी नसली किंवा अचानक पाहुणे आले तरी ही भाजी अगदी १५ मिनिटांत तयार होते आणि चपाती किंवा भाकरीसोबत तर अप्रतिम लागते.(Maharashtrian recipes)
आजच्या धावपळीत रोज डब्याला काय बनवायच हा प्रश्न अनेकांना पडतो म्हणूनच शेव-टोमॅटोची भाजी हे आजही सर्वांच्या घरातलं फेव्हरेट ऑप्शन झालं आहे.(Village style curry) ऑफिसला जाताना, मुलांना टिफिन द्यायचं असेल, किंवा घरात अचानक भूक लागली तरी ही भाजी चमचमीत, रंगदार आणि झटपट तयार होते. ही रेसिपी कशी बनवायची पाहूया.
चहा-कॉफी नको, रोज सकाळी उपाशीपोटी प्या ७ ड्रिंक्स, केसगळती थांबेल-वजनही वाढणार नाही-डॉक्टरांचा सल्ला
साहित्य
तेल - आवश्यकतेनुसार
मोहरी - १ चमचा
जिरे - १ चमचा
हिंग - १ चमचा
कढीपत्ता
बारीक चिरलेला लसूण पाकळ्या - ५ ते ६
बारीक चिरलेले आले - १ तुकडा
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ ते ३
बारीक चिरलेले टोमॅटो - १ वाटी
मीठ - चवीनुसार
लाल मिरची पावडर - १ चमचा
लसूण चटणी -१ चमचा
गूळ - १ छोटी वाटी
गरम मसाला - १ चमचा
पाणी - आवश्यकतेनुसार
हळद - १ चमचा
धने पावडर - १ चमचा
शेव- १ वाटी
कोथिंबीर
बाजरीची खिचडी हिवाळ्यात खाता पण बाजरीचा हलवा खाल्ला आहे का? ही घ्या एकदम चविष्ट रेसिपी
कृती
1. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात तेल घाला. त्यानंतर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण, आले, हिरवी मिरची घालून परतवून घ्या. त्यानंतर टोमॅटो आणि मीठ घालून पुन्हा परतवा.
2. आता यामध्ये लाल मिरची पावडर, लसूण चटणी घाला. झाकण ठेवून त्यावर पाणी घाला. ज्यामुळे टोमॅटो लवकर शिजण्यास मदत होतील.५ मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून चमच्याने ढवळून घ्या. त्यात गूळ, गरम मसाला, पाणी घालून उकळी येऊ द्या.
3. यानंतर हळद, धने पावडर, शेव आणि कोथिंबीर घाला. परतवून घ्या. शेवला जास्त शिजवू नका. गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खा टोमॅटो शेव भाजी.
