भारतीय संस्कृतीत आवळ्याला फक्त फळ म्हणून नव्हे, तर 'अमृतफळ' म्हणून ओळखले जाते. व्हिटॅमिन 'सी' चा खजिना असलेला आवळा, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते त्वचेचे आणि केसांचे आरोग्य जपण्यापर्यंत अनेक फायदे देतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळणारा हा गुणकारी आवळा, वर्षभर आपल्या आहारात ठेवण्यासाठी आणि त्याच्या पौष्टिकतेचा शरीराला योग्य फायदा मिळण्यासाठी आवळ्याचा मुखवास हा एक उत्तम पर्याय आहे. आवळ्याचा मुखवास म्हणजे चवीला चटपटीत आणि पचनासाठी अत्यंत हलका, असा एक पारंपरिक पदार्थ! जेवणानंतर किंवा दिवसभरात कोणत्याही वेळी खाण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे(How To Make Amla Beetroot Mukhvas At Home Recipe).
रोज जेवणानंतर आवळ्याचा हा खास घरगुती मुखवास खाल्ल्याने पचन सुधारते, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो आणि तोंडाची दुर्गंधी कमी होते. सर्वात खास म्हणजे हा मुखवास एकदा तयार करून ठेवला तर संपूर्ण वर्षभर खराब न होता सहज याची चव चाखता येते, म्हणून प्रत्येक घरात आवळ्याचा मुखवास असायलाच हवा... वर्षभर टिकणारा आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर (Amla Beetroot Mukhvas Recipe) असा घरगुती आवळ्याचा मुखवास कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. आवळे - १५ ते २०२. बीटरुट - १ लहान आकाराचे बीट ३. काळीमिरी पूड - १/४ टेबलस्पून ४. जिरेपूड - १/२ टेबलस्पून ५. चाट मसाला - १ टेबलस्पून ६. हिंग - १/४ टेबललस्पून ७. सैंधव मीठ - १/४ टेबलस्पून ८. साधं मीठ - १/४ टेबलस्पून ९. पिठीसाखर - १ टेबलस्पून १०. धणेपूड - १ टेबलस्पून ११. गरम मसाला - १/२ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यांत आधी आवळे पाण्याने स्वच्छ धुवून ते किसणीच्या मदतीने किसून बारीक किस करून घ्यावा. २. याचप्रमाणे, बीटरुट देखील किसून त्याचा किस तयार करून घ्यावा. ३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा पसरट ताटात आवळ्याचा व बीटाचा किस दोन्ही एकत्रित मिक्स करून घ्यावे.
किलोभर मटार सोला झटपट! ३ ट्रिक्स-मटार सोलायचे किचकट काम करा काही मिनिटांत पटपट...
४. आवळा व बीटरूटचा किस एकत्रित करून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार काळीमिरी पूड, जिरेपूड, चाट मसाला, हिंग, सैंधव मीठ, साधं मीठ, पिठीसाखर, धणेपूड, गरम मसाला असे सगळे जिन्नस घालावेत. ५. मग हे सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे. ६. मग एका सुती कापडावर किंवा पसरट परातीमध्ये हे तयार मिश्रण पसरवून ३ ते ४ दिवस उन्हांत वाळवून घ्यावे.
व्यवस्थित उन्हांत वाळवून घेतलेला आवळ्याचा मुखवास एअर टाईट कंटेनरमध्ये भरुन स्टोअर करून ठेवावा. अशाप्रकारे हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या, रसरशीत आवळ्याचा वर्षभर टिकणारा आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा मुखवास यंदा नक्की करून पाहा.
Web Summary : Make Amla Mukhwas with beetroot, a traditional, tasty, and healthy digestif using winter-available amla. This recipe details how to create this flavorful, year-long treat, beneficial for digestion and oral health.
Web Summary : सर्दियों में मिलने वाले आंवले का उपयोग करके चुकंदर के साथ आंवला मुखवास बनाएं, जो एक पारंपरिक, स्वादिष्ट और स्वास्थ्यवर्धक पाचक है। यह रेसिपी इस स्वादिष्ट, साल भर चलने वाले व्यंजन को बनाने का तरीका बताती है, जो पाचन और मौखिक स्वास्थ्य के लिए फायदेमंद है।