Lokmat Sakhi >Food > पारंपरिक चवीचा गावरान ठेवा खमंग अंबाडीची भाकरी, टम्म फुगण्यासाठी सोपी ट्रिक- पाहा रेसिपी

पारंपरिक चवीचा गावरान ठेवा खमंग अंबाडीची भाकरी, टम्म फुगण्यासाठी सोपी ट्रिक- पाहा रेसिपी

Ambadi Bhakri: Traditional Maharashtrian food: Healthy Indian recipes: सोपी ट्रिक वापरुन अंबाडीची टम्म फुगलेली भाकरी बनवू शकतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2025 15:40 IST2025-09-07T15:39:54+5:302025-09-07T15:40:36+5:30

Ambadi Bhakri: Traditional Maharashtrian food: Healthy Indian recipes: सोपी ट्रिक वापरुन अंबाडीची टम्म फुगलेली भाकरी बनवू शकतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

How to make Ambadi Bhakri at home Traditional Maharashtrian Ambadi Bhakri recipe Easy puffing trick for Ambadi Bhakri | पारंपरिक चवीचा गावरान ठेवा खमंग अंबाडीची भाकरी, टम्म फुगण्यासाठी सोपी ट्रिक- पाहा रेसिपी

पारंपरिक चवीचा गावरान ठेवा खमंग अंबाडीची भाकरी, टम्म फुगण्यासाठी सोपी ट्रिक- पाहा रेसिपी

भारतीय खाद्यसंस्कृतीत प्रांत बदलला की, पदार्थांच्या चवी देखील बदलतात.(Traditional Maharashtrian food) गावाकडच्या भागात आजही स्वयंपाकघरात विविध पारंपरिक खाद्यपदार्थ बनवले जातात. हे पदार्थ फक्त चविष्ट नाही तर पौष्टिक देखील असतात. त्यातीलच एक अंबाड्याची भाकरी.(Traditional Maharashtrian food) हा पदार्थ प्रामुख्याने कोकण आणि मराठवाडा भागात मोठ्या प्रमाणात केला जातो. अंबाडा म्हणजे जास्वंदीच्या पानांसारखा दिसणारा हिरवा पाला.(Healthy Indian recipes) पण याची चव मुळत: थोडीशी आंबट असते. या पानांमुळे भाकरीला चव येते. ज्यामुळे गावाकड्याच्या भागात हा पदार्थ नेहमीच खाल्ला जातो. (Authentic village recipes)
पावसाळ्यात अंबाडीची पाने सहज मिळतात. गावाकडच्या अंगणात किंवा शेतातली ताजी पानं तोडून लगेच भाकरी बनवली जाते.(Iron rich flatbread) अनेकदा आपणही अंबाडीची भाकरी करण्याचा प्रयत्न करतो. पण ती काही व्यवस्थित बनत नाही किंवा फुगत नाही.अशावेळी ही सोपी ट्रिक वापरुन अंबाडीची टम्म फुगलेली भाकरी बनवू शकतो. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती 

गिलक्याची भाजी आवडत नाही? 'या' पद्धतीने करा भरली गिलकी, झणझणीत मसाला रेसिपी झटपट

साहित्य 

अंबाडीची भाजी - १ जुडी 
पाणी - १ कप 
हिरव्या मिरच्या - ७ ते ८ 
लसूण पाकळ्या - १० ते १२
कढीपत्त्याची पाने - ५ ते ६
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 
तेल - आवश्यकतेनुसार
शेंगदाणे - १ छोटा कप 
जिरे - १ चमचा 
मीठ - चवीनुसार
ज्वारीचे पीठ - २ कप 
लसूण पेस्ट - अर्धा चमचा 
धणे जीरे पूड- १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी अंबाडीची भाजी व्यवस्थित स्वच्छ करुन घ्या. आता कढईत पाणी घालून त्यात अंबाडीची भाजी मंद आचेवर शिजू द्या. यावर झाकण झाकून ठेवा. ज्यामुळे ती लवकर शिजेल. 

2. आता दुसऱ्या बाजूला ठेचा करण्यासाठी सगळ्यात आधी मिरचीचे देठ काढून घ्या. त्यानंतर तव्यावर चमचाभर तेल घालून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, कञीपत्ता, शेंगदाणे, जिरे चांगले परतवून घ्या. त्यानंतर कोथिंबीर घालून पुन्हा परतून घ्या. आता खलबत्त्यात कुटताना ठेच्याचे सर्व भाजलेले साहित्य घाला आणि त्यात वरुन मीठ घाला. ठेचा व्यवस्थित ठेचून घ्या. 

3. भाकरी करण्यासाठी भाजी व्यवस्थित शिजली आहे की, नाही हे पाहा. आता मोठ्या ताटात ज्वारीचे पीठ आणि शिजवलेली अंबाडीची भाकरी व्यवस्थित मिक्स करुन घ्या. हे चमच्याने गरम असताना पिठात मिक्स करा. आता त्यात ज्वारीचे पीठ, लसूण पेस्ट, धणे- जीरे पूड आणि मीठ घालून भाकरीचे पीठ मळून घ्या. जितके चांगले पीठ मळाल, भाकरी तितकी छान होईल. 

4. हाताने किंवा लाटून भाकरी तयार करा. आता तव्यावर भाकरी परसवून वरच्या बाजूने पाणी घाला. पाणी सुकल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून घ्या. भाकरी हळूहळू टम्म फुगेल. गरमागरम भाकरीसोबत खा झणझणीत मिरचीचा ठेचा. 


Web Title: How to make Ambadi Bhakri at home Traditional Maharashtrian Ambadi Bhakri recipe Easy puffing trick for Ambadi Bhakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.